Union Minister Bhupender Yadav In Bjp Office Goa
Union Minister Bhupender Yadav In Bjp Office Goa  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: 'म्हादईवर भाष्य करण्यास मी तज्ञ नाही', केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी म्हादईच्या प्रश्नांना दिली बगल

Rajat Sawant

Mahadayi Water Dispute: म्हादईबद्दल भाष्य करण्यासाठी मी वैज्ञानिक तज्ञ नाही आणि म्हादईचे पाणी वळवण्याच्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी वेळ हवा आहे. या मुद्द्याचा तपशीलवार अभ्यास केल्यावर म्हादईबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले.

आज त्यांनी भाजप कार्यालयात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशावर दीर्घकालीन परिणाम करेल, असे सांगत विविध मुद्द्यांचा पुनरुच्चार केला. मात्र, म्हादईचा मुद्दा ज्या मंत्रालयावर बेतलेला आहे, त्याबाबत त्यांनी बोलणेच टाळले.

पत्रकारांनी अक्षरश: प्रश्नांचा भडिमार करूनही ‘तथ्यांच्या आधारे अभ्यास करू’ इतकेच ते सांगत राहिले. त्यामुळे पाणी कुठे तरी मुरते आहे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या गोव्यात म्हादई नदी या ज्वलंत विषय बनला आहे. म्हादईत झालेल्या कोणत्याही बदलांचा परिणाम झुवारीवरही निश्चितच होतो. त्यामुळे, पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने जे परिणाम म्हादईवर होतील, तेच परिणाम झुवारीवरही होणे क्रमप्राप्त आहे.

गोवेकरांसाठी म्हादई प्रश्न संवेदनशील बनला असतानाच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी "भाजपने दोन्ही राज्यांमधील दीर्घकाळचा म्हादईचा वाद मिटवला असून. 

म्हादईचे पाणी कर्नाटकला देवून येथील शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवण्याचे काम केले आहे" असे विधान केल्यावर गोव्यातील वातावरण काहीसे तंग बनले होते.

मात्र गोवा मुख्यमंत्रांसह भाजपचे नेते म्हादई गोव्याची आहे आणि तिचे पाणी गोव्यालाच मिळणार असा सूर लावत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT