Power shutdown
Power shutdownDainik Gomantak

Vasco : वास्कोत 'या' भागात 3 दिवस विजेचा पुरवठा असणार बंद; वाचा सविस्तर

त्यामुळे या दिवशी विजेवर अवलंबून असणारी कामे प्रलंबित ठेवावी लागणार आहेत
Published on

Vasco : वास्को येथील कदंबा उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीमुळे काही काळासाठी वीज बंद करण्याचे नियोजन विभागामार्फत करण्यात आले आहे. याबाबतची माहिती प्रसिध्दिपत्रकाद्वारे जारी करण्यात आली आहे.

7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 वाजता या वेळेत वास्कोतील काही भागांमध्ये वीज बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी विजेवर अवलंबून असणारी कामे प्रलंबित ठेवावी लागणार आहेत.

Power shutdown
Mahadayi Water Dispute: मंत्री नाईक माहित नाही पण सार्दिन लोकसभेत म्हादईचा मुद्दा मांडणार - गोवा काँग्रेस

मिळालेल्या माहितीनुसार, 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 या वेळेत चिखली हॉस्पिटल, SMRC हॉस्पिटल, कॉटेज हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, विद्या मंदिर हायस्कूल, आनंद रेसिडन्सी, वाडे तलाव, मेरशी वाडे आणि आजूबाजूच्या परिसरातील भागांमध्ये वीज बंद करण्याचे नियोजन आहे.

8 फेब्रुवारी रोजी नवे वाडे, सुशीला सी विंड आणि शांतीनगर या भागात सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 या वेळेत वीज बंद करण्यात येणार आहे.

Power shutdown
Goa News: म्हापशातील ‘चिकनचा कचरा’ आता कुंडईला

9 फेब्रुवारी रोजी शहर परिसर, हॉटेल टाटो, HQ, एसबीआय बॅंक, रेल्वे स्टेशन परिसर, खारीवाडा आणि मंगूरच्या काही भागात सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 या वेळेत वीज बंद करण्यात येणार आहे.

विज पुरवठा बंद असण्याचे कारण देताना विजखात्याने तातडीच्या कारणात्सव हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं म्हटले आहे. त्यामुळे या भागातील नागरीक तसेच छोट्या -मोठ्या व्यावसायिकांना या वेळेत विज पुरवठा होऊ शकणार नाही. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com