Union Min Shripad Naik Attend State level launch of PM Vishwakarma Scheme Program Dainik Gomantak
गोवा

Vishwakarma Scheme: "पात्र व्यक्तींनी पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्या", केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे आवाहन

पंतप्रधानांनी 18 लाभार्थ्यांना विश्वकर्मा प्रमाणपत्रांचे वितरण केले

Rajat Sawant

PM Modi Launches Vishwakarma Scheme: "पारंपरिक व्यवसायात असलेल्या कारागीर आणि शिल्पकारांना व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना त्यांना प्रोत्साहित करते. तसेच युवा वर्गाला ही योजना त्यांच्या पारंपारिक व्यवसायात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देते. पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन" केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

रविवारी पणजी येथे आयोजित पीएम विश्वकर्मा योजनेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार सदानंदशेठ तानावडे, गोव्याचे कृषी, हस्तकला आणि नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांसाठी पीएम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला."

"पीएम विश्वकर्मा बोधचिन्ह, ‘सम्मान, सामर्थ्य, समृद्धी’ या घोषवाक्याचे आणि पोर्टलचे उद्घाटन तसेच कस्टमाईज्ड स्टँप शीट आणि टूलकिट बुकलेटचे देखील उद्घाटन केले. पंतप्रधानांनी 18 लाभार्थ्यांना विश्वकर्मा प्रमाणपत्रांचे वितरण केले."

"पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांना व्यवसायासाठी आवश्यक असलेले अर्थसाहाय्य मिळवणे आणि कौशल्यात वाढ करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण मिळवणे सोपे होते,” अशी माहिती मंत्र्यांनी दिली.

देशाची सेवा करत असताना पंतप्रधान मोदी अंत्योदयाच्या सिद्धांताचे अनुसरण करत आहेत. पंतप्रधान नेहमीच समाजाच्या उपेक्षित घटकांचा विचार करत असतात. पीएम विश्वकर्मा योजना समाजामध्ये कारागीरांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे असे राज्यसभा खासदार सदानंदशेठ तानावडे यांनी सांगितले.

गोव्याचे कृषी, हस्तकला आणि नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक यांनी देखील या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. यावेळी केंद्रीय आणि राज्य सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona: पर्यटन व्यवसायातील कामगारांचे हित जपणार, काणकोणात मंत्री तवडकरांची ग्वाही

Valpoi Road Issue: होंडा येथील रस्त्यांची दुरवस्था, गावकरवाडा ते पोलिस स्टेशनपर्यंत दैना; नवरात्रीपूर्वी डागडुजी करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Live News: व्लॉगर अक्षय वशिष्ठला जामीन मंजूर!

Goa Crime: फार्म हाउसमधील रोख, दुचाकी घेऊन काढला होता पळ, 6 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

Shirgaon Stampede: 'शिरगाव' दोषींवर कारवाई होणार? गृह खात्याकडून फाईल सरकारकडे, काय आहे चौकशी समितीचे म्हणणे?

SCROLL FOR NEXT