गोवा, ड्रग्ज सिंडिकेट आणि रशियन माफिया; KGF स्टार यशच्या नव्या क्राईम थ्रिलर चित्रपटाची घोषणा

२०२४ मध्ये या चित्रपटाचे शुटींग सुरु होण्याची शक्यता आहे.
Actor Yash New Film Based On Goa
Actor Yash New Film Based On GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Actor Yash New Film: कन्नड चित्रपटांमधून भारतीय चित्रपटाला KGF फेम यशच्या रूपाने एक तगडा भारतीय स्टार मिळाला आहे. KGF-2 च्या प्रचंड यशानंतर, यशचा पुढचा चित्रपट कोणता असेल याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

अशातच यशचा आगामी चित्रपट कोणत्या विषयावर आधारीत असणार आहे याची माहिती समोर आली आहे. KGF प्रमाणे त्याचा नाव चित्रपट देखील एक पीरियड क्राईम ड्रामा असेल.

60 च्या दशकात गोव्यात झालेली रशियन आणि ड्रग्ज माफियांची घुसखोरी या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर राजीव मेनन यांच्या पत्नी, लता मेनन या चित्रपटाच्या दिग्दर्शक असणार आहेत.

दक्षिणेत गोव्यातील ड्रग माफियांवर प्रकाश टाकणारे कमी चित्रपट आले आहेत. यामुळे अभिनेता यशला चित्रपटाचे कथानक खूप आवडले असून, त्यांने प्रोजेक्टवर गांभीर्याने काम करण्यास सुरुवात केली आहे.

केजीएफप्रमाणे हा चित्रपटही अॅक्शन थ्रिलर असेल. यश स्वतः या चित्रपटाचा निर्माता आहे. 100 कोटींपेक्षा अधिक रुपये या चित्रपटाचे बजेट असेल असे बोलले जात आहे.

यशला चित्रपटाचे कथानक इतके आवडले आहे की तो सध्या इतर प्रकल्पांना बाजूला ठेऊन त्याने आपले संपूर्ण लक्ष नव्या चित्रपटावर केंद्रित करत आहे. ड्रग्ज आणि रशियन माफिया सोबतच हिप्पी संस्कृतीचे जे वातावरण त्यावेळी तिथे होते हे सर्व चित्रपटात दाखवले जाईल.

यश या चित्रपटात कोणती भूमिका साकारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यश गोव्याचा ड्रग माफिया होईल का? रशियन माफियांचा सफाया करणाऱ्या पोलिस निरीक्षकाची भूमिका तो साकारणार? याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये या चित्रपटाचे शुटींग सुरु होण्याची शक्यता आहे. यशच्या या नव्या चित्रपटाची आतुरता सर्वांनाच लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com