Dabolim School Jihad Row: गोव्यात मागील 10 वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी इस्लामिक कार्यशाळेचे आयोजन केले जात असल्याचे स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया संस्थेने स्वत: सांगितले आहे. या संघटनेचा टर्की देशातील टुगवा या आतंकवादी संघटनेशी संबंध आहे. असा आरोप गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी यांनी केला.
लव्ह जिहाद’वर आधारित द केरल स्टोरीज् चित्रपटाप्रमाणे द गोवा स्टोरी तयार केली जात असल्याचे थळी म्हणाले. हिंदू जनजागृती समितीने आयेजित केलेल्या विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
गोव्यातील केशव स्मृती विद्यालयात घडलेल्या घटनेवर यावेळी जयेश थळी यांनी भाष्य केले. गोव्यात पालकांनी अशा घटना सर्वांसमोर येऊन सांगितल्या पाहिजेत, अन्यथा या षड्यंत्राला अजून विद्यार्थी बळी पडण्याची शक्यता आहे. गोव्यातील प्रशासन आणि पोलीस यांनी या घटनेचा तपास करून विद्यार्थ्यांमध्ये जिहादी मनोवृत्ती रूजवण्याचे षड्यंत्र रोखायला हवे. असे थळी म्हणाले.
गोव्यातील दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयाच्या व्यवस्थापनाने शिक्षण खाते, विद्यालयाचे व्यवस्थापकीय मंडळ, पालक यांना अंधारात ठेवून विद्यालयाच्या हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीत इस्लामिक कार्याशाळेसाठी पाठवले. असा आरोप विश्व हिंदु परिषदेचे दक्षिण गोवा सहमंत्री संजू कोरगावकर यांनी केला.
स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया यांच्या सूचनेवरून विद्यालयाच्या व्यवस्थापनाने ही कृती केली. आंदोलनानंतर विद्यालयाच्या प्राचार्यांना निलंबित करण्यात आले. पण, विद्यालयाच्या व्यवस्थापनाने स्वत:ला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांचा गैरवापर केला व विद्यार्थ्यांना रस्त्यावर आंदोलन करण्यास भाग पाडले. असे संजू कोरगावकर म्हणाले.
विद्यालयामध्ये इस्लामी आतंकवाद पसरवून धर्मांतर करण्याचा हा प्रकार आहे. गोव्यात वर्ष 2018 ते 2023 या कालावधीत 1 हजार 753 मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी आहे. सरकार आणि प्रशासन यांनी केशव स्मृती विद्यालयाचे व्यवस्थापकीय मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक नेमला पाहिजे. निलंबित प्राचार्यांना सेवेतून बडतर्फ केले पाहिजे. अशी मागणी कोरगावकर यांनी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.