पणजी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प २०२५-२६ हा सामान्य माणसासाठी आणखी एक मोठा धक्का आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक संकटावर कोणतेही ठोस उपाय नसल्याने हा अर्थसंकल्प अपयशी ठरला असल्याची टीका गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
जनविरोधी आणि दिशाहीन अर्थसंकल्प आहे. मध्यमवर्ग, शेतकरी (Farmer) आणि कामगारांना दुर्लक्षित करणारा हा अर्थसंकल्प असून तो काही मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, रोजगार निर्मितीचा कोणताही आराखडा या अर्थसंकल्पात नाही.
त्यांनी पुढे म्हटले आहे, की जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, पण सरकारने त्यावर कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. इंधन आणि अन्नधान्याच्या वाढत्या किमतीमुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण आहे, त्याची सोडवणूक नाही. जाहीर केलेली करसवलत ही अगदी अल्प असून ती सामान्य माणसाच्या खिशात फारसा पैसा देऊ शकत नाही.
जीएसटी, इंधन करामध्ये कोणतीही कपात नाही. त्यामुळे महागाई (Inflation) कायम राहणार आहे. त्याशिवाय कोट्यवधी बेरोजगार तरुणांसाठी या अर्थसंकल्पात कोणतेही ठोस धोरण नाही.
सरकारी आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्राला पुरेशी आर्थिक मदत नाही. त्यामुळे लोकांना महागड्या खासगी सेवांवर अवलंबून रहावे लागणार आहे.
तोटा कमी करण्यासाठी समाजकल्याण योजना कमी केल्या आहेत, त्याचा ग्रामीण भागावर परिणाम होऊ शकतो.
शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवण्यासंबंधी कोणतीही ठोस घोषणा नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.