Amit Patkar: सुलेमान खानला अटक करा; गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना पत्र

Amit Patkar Letter To Karnataka Home Minister: गोवा सरकारने कर्नाटक सरकारसोबत संपर्कात राहून फरार आरोपीला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत; काँग्रेस
Goa Congress Suleman Khan: सुलेमान खानला अटक करा; गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना पत्र
Amit Patkar demands Suleman Khan's arrestDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress demands Suleman Khan's arrest

पणजी: गोव्यातील जमीन हडप प्रकरणातील मास्टरमाईंड फरार सिद्दीकी उर्फ सुलेमान खान याला अटक करा, अशी मागणी करणारे पत्र गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना लिहले आहे. गुन्हे शाखेच्या कोठडीतून फरार झालेल्या सुलेमान कथितपणे हुबळीत लपून बसल्याची माहिती समोर आलीय, असे पाटकरांनी म्हटलंंय.

अमित पाटकर यांनी गृहमंत्र्याना लिहलेल्या पत्रात सुलेमान खान राज्यातील जमीन हडप प्रकरणातील मास्टर माईंड असल्याचा उल्लेख करत, त्याला कोठडी सुरक्षितपणे ठेवण्यात चूक झाल्याचे नमूद केले आहे. भाजप नेतृत्वाखालील राज्यात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थि केले आहे. गोवा सरकारने कर्नाटक सरकारसोबत संपर्कात राहून फरार आरोपीला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे म्हटले आहे.

Goa Congress Suleman Khan: सुलेमान खानला अटक करा; गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना पत्र
Goa Widow Pension: विधवा महिलांना दिलासा, सरकारकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्यात 'एवढी' वाढ

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणात काळजीपूर्वक लक्ष घालून सुलेमान खानच्या अटकेसाठी प्रयत्न करावे, असे पाटकरांनी पत्रात म्हटले आहे. सुलेमान खान गुन्हे शाखेच्या कोठड़ीतून फरार झाल्यापासून काँग्रेसने सत्ताधारी भाजप आणि पोलिसांवर टीकेची झोड उठवली आहे. या प्रकरणात बडे अधिकारी आणि राजकीय नेते देखील सहभागी असल्याचा आरोप विरोधक करतायेत. दरम्यान, आता पाटकरांनी सुलेमान हुबळीत असल्याचा दावा करत, थेट कर्नाटकच्या गृहमंत्र्यांकडे त्याच्या अटकेची मागणी केलीय.

Goa Congress Suleman Khan: सुलेमान खानला अटक करा; गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना पत्र
Goa Liberation: 'माझ्या गोव्याच्या भूमीत ‘दम मारो दम’ला उधाण, रक्ताळली नदी, खाण उकरून'; संपादकीय

अमित नाईक ते हजरत अली

सुलेमान खानला गुन्हे शाखेच्या कोठडीतून बाहेर काढण्यासा आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईकने मदत केली. त्याच्याच दुचाकीवर बसून सुलेमान हुबळीत आल्याची माहिती आहे. हुबळीत त्याला हजरत अलीने मदत केल्याचे समोर आले असून, त्याला पोलिसांनी अटक केलीय. सुलेमानला मदत करणारे दोघेही अटकेत असले तरी त्याचा पत्ता अद्याप सापडलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com