Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: घात की अपघात? वास्को रेल्वे रुळाजवळ आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

Unidentified body Sankval Vasco: सांकवाळ आणि वास्को रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्यानंतर वास्को रेल्वे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

Sameer Amunekar

वास्को: सांकवाळ आणि वास्को रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्यानंतर वास्को रेल्वे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सर्वप्रथम वास्कोच्या डेप्युटी स्टेशन मॅनेजरने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला.

सुमारे ४५ ते ५० वयाच्या पुरुषाचा हा मृतदेह असून मृत व्यक्तीचे शरीर पातळ, गोरा रंग आणि उंची सुमारे ५ फूट ६ इंच आहे. अंगावर निळ्या रंगाचा लांब बाह्यांचा शर्ट आणि काळी फॉर्मल पँट आहे.

प्राथमिक चौकशीत त्या व्यक्तीचा मृत्यू चालताना किंवा रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करताना झाला असावा, असा कयास आहे. मृतदेह शवचिकित्सेसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. उपनिरीक्षक कृष्णा तळपी चौकशी करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT