Accidental Death: Dainik Gomantak
गोवा

Accidental Death: सेप्टिक टँकमध्ये गुदमरून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Accidental Death: एकतानगर, म्हापसा येथील गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीजवळ एका घराचा सेप्टिक टँक उपसण्यासाठी त्यात उतरलेल्या कामगाराचा विषारी वायुमुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.

दैनिक गोमन्तक

Accidental Death: एकतानगर, म्हापसा येथील गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीजवळ एका घराचा सेप्टिक टँक उपसण्यासाठी त्यात उतरलेल्या कामगाराचा विषारी वायुमुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. यमनाप्पा मदार (वय २४, रा. लक्ष्मीनगर-म्हापसा, मूळ बेळगाव) असे मृताचे नाव असून गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

ही दुर्घटना गुरुवारी रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी घडली. या कामगाराला बाहेर काढण्यासाठी म्हापसा अग्निशमन दलाला पाचारण केले. दलाचे जवान तिथे पोहोचले असता टँकचे तोंड अतिशय लहान असून आत विषारी वायू साठल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी टँकचे तोंड मोठे केले आणि एक जवान सुरक्षेची साधने वापरून आत उतरला.

त्यांनी बेशुद्ध कामगाराला बाहेर काढून त्याला इस्पितळात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. म्हापसा पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली आहे.

एकतानगर भागातील गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीजवळ एका घराचा सेप्टिक टँक उपसण्याचे काम गुरुवारी रात्री चार कामगारांनी सुरू केले. यावेळी यमनाप्पा हा टँकमध्ये उतरला. या टँकचे तोंड अरुंद आणि खोली सुमारे ४ मीटर खोल आहे.

टँकमध्ये गेल्यावर तो काही वेळातच बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी दुसरा कामगार आत उतरला. मात्र, श्वास कोंडू लागल्याने तो लगेच वर आला. त्यामुळे तो बचावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT