Goa Tourism: सध्या इंटरनेटवर शोध घेतल्या जाणाऱ्या जागेत अयोध्येने गोव्यालाही मागे टाकले आहे. बहुप्रतिक्षित राम मंदिराचे उदघाटन झाल्यानंतर अयोध्येला भेट देण्यासाठी ॲप वापरकर्ते आणि पर्यटकांनी लक्षणीयरित्या बुकिंग केल्यामुळे अयोध्या हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक बनण्यासाठी सज्ज झाले आहे.
यामुळे गोवा सरकारनेही आता आध्यात्मिक पर्यटनावर भर देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी 11 मंदिरांची निवड केली आहे. भारतामध्ये आध्यात्मिक पर्यटनाला गती मिळाल्याने राम मंदिर उदघाटनानंतर अयोध्या हे स्थळ सर्वांत इच्छित पर्यटन स्थळांपैकी एक बनण्यास सज्ज झाले आहे.
समाज माध्यमांवर दिलेल्या माहितीनुसार, सध्या अयोध्येतील खोलीचे रात्रीचे आरक्षण देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी सुमारे 10 टक्के आहे. त्यामुळे वाढीची शक्यता लक्षणीय आहे.अयोध्येमुळे पर्यटन क्षेत्रात झालेल्या बदलाला प्रत्युत्तर म्हणून राज्य सरकार समुद्र-किनारा-केंद्रित पर्यटन प्रारूपामधून अधिक सर्वसमावेशक आणि लोककेंद्रित दृष्टिकोनाकडे वळत आहे.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या म्हणण्यानुसार, गोवा दक्षिण काशी म्हणून ओळखले जाईल. गेल्या वर्षी उत्तराखंड सरकारसोबत आध्यात्मिक, निरोगी आणि इको-टुरिझम सर्किट्सला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गोवा आणि उत्तराखंडमध्ये पर्यटकांना येण्या-जाण्याची सोय करण्यासाठी संयुक्त पर्यटन पॅकेज तयार करण्यावर भर देत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
गोव्यात येणारा सरासरी देशी पर्यटक चार रात्री आणि एक आंतरराष्ट्रीय पर्यटक नऊ रात्री राहतो. त्यांना आकर्षित करण्यासाठी वारसा पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. वारसा घरांचाही समावेश त्यात आहे आणि राज्य पुढील महिन्यापर्यंत धोरण जाहीर करू शकते.
आमच्याकडे जुनी पोर्तुगीजकालीन वारसा घरे आहेत आणि या धोरणातून आम्ही अशा लोकांना त्यांच्या घराचे एका विशिष्ट टप्प्यापर्यंत नूतनीकरण करण्यासाठी आर्थिक पाठबळ देऊ. त्या घरांचा पर्यटनासाठी वापर केला जाईल. त्यासाठी पहिल्या वर्षी ३० घरे निवडली आहेत.
पर्यटन उद्योग राज्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) १६.४३ टक्के आहे आणि पुढील तीन वर्षांत तो ४-५ टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र तसे होताना संसाधनांचे अतिशोषण होणार नाही याची खात्री करणे आणि त्याऐवजी आर्थिक आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. गोव्यातील सुमारे ३४ टक्के रोजगार पर्यटन क्षेत्र देते.
गोवा दुसऱ्या स्थानी
‘ओयो’चे रितेश अग्रवाल म्हणाले, अयोध्येत ओयो ॲप वापरकर्त्यांमध्ये ७० टक्के वाढ झाली आहे. गोव्यात हे प्रमाण ५० टक्के, तर त्याखालोखाल नैनिताल ६० टक्के इतके प्रमाण आहे. तेथील सर्व हॉटेल्स पूर्णतः आरक्षित झाली असून खोली भाडे दररोज ७ हजार रुपयांवर पोचले आहे.
गोव्याचे पर्यटनही टाकणार कात
अयोध्येत मंदिर खुले झाल्यानंतर दररोज तीन ते पाच लाख लोक भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोव्याचा पर्यटन उद्योग परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आला आहे. गोवा सरकार आता आध्यात्मिक स्थळे, हेरिटेज होम आणि कृषी पर्यटनाला चालना देणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.