underground power Dainik Gomantak
गोवा

Underground Electricity Goa : भूमिगत वीजवाहिन्यांमुळे वीजपुरवठा सुरळीत होईल; अभियंता मयूर हेदेंचे मत

उपाययोजना सुरू : वीज विभागाने वीज उपकेंद्रे उभारण्याचे आणि संपूर्ण गोव्यात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले आहे

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी : गोव्यात दरवर्षी विजेचा वापर वाढत आहे. यासाठी वीज विभागाने वीज उपकेंद्रे उभारण्याचे आणि संपूर्ण गोव्यात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले आहे. या नवीन वीज उपकेंद्र आणि भूमिगत वीजवाहिन्यांमुळे लोकांना अधिक सुरळीतपणे वीजपुरवठा करण्यास वीज विभाग सक्षम होईल. यामुळे विभागाला महसूल मिळण्यास मदत होईल, असे विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता म्हणाले.

‘दै. गोमन्तक’ने विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता मयूर हेदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, वीज विभाग साळगाव येथे २२०/३३ केव्ही, ३ बाय ६३ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त हायव्होल्टेज सबस्टेशन आणत आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. या प्रकल्पाचा खर्च ३५० कोटी रुपये असून पूर्ण करण्याची मुदत २ वर्षे आहे.

शिवाय ओव्हरलोडिंगमुळे आणि थिवी सबस्टेशनच्या विस्तारासाठी जागा अपुरी असल्यामुळे, २२०/३३ केव्ही, ६३ एमव्हीए क्षमतेचा इथे ट्रान्स्फॉर्मर लावण्यात आला आहे. कळंगुट, बागा, कांदोळी, नागोवा किनारपट्टी भागात लोडशेडिंगची समस्या होती. त्यामुळे वीज विभागाने कळंगुट येथे ३३ बाय ११ केव्ह, २ बाय ४० एमव्हीएचे ३० कोटी रुपयांचे नवीन जीआयए उपकेंद्र उभारले आहे.

दक्षिण गोव्याच्या वीजपुरवठ्यावर भाष्य करताना हेदे यांनी खुलासा केला की, वेर्णा सबस्टेशनवरील सध्याचा ट्रान्स्फॉर्मर या महिन्याच्या आत बदलला जाईल. दीर्घकालीन गरज लक्षात घेता, लोटली येथे २२० बाय ३३ केव्ह, ३ बाय ६३ एमव्हीए सबस्टेशन लवकरच येईल. या प्रकल्पासाठी जीआयडीसीने जमिनीचे वाटप केले आहे. सल्लागाराची नियुक्ती करून प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार केला आहे. ३ महिन्यांत या प्रकल्पाची निविदा काढली जाईल. डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल.

काम लवकरच पूर्ण होईल

मुरगाव तालुक्यातून वारंवार वीज खंडित होण्याबाबत विचारले असता, हेदे यांनी सांगितले की, वेर्णा सबस्टेशन ते वास्को शहर ते सांकोळेमार्गे ३३ केव्ही डबल सर्किट टॉवर लाईन उच्च प्रवाह वहन क्षमता कंडक्टर २ बाय १००० एमव्हीए बदलण्यात आली आहे. वेर्णा ते सांकवाळपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे आणि सांकवाळ ते वास्कोपर्यंतचे काम महिन्याभरात पूर्ण होईल. या प्रकल्पाचा खर्च सुमारे ३० कोटी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT