Panaji Municipal Corporation: मानधन वाढले आता समस्या कधी मांडणार?

महानगरपालिकेच्या बैठकीत नुसतीच हजेरी नको
Panaji Municipal Corporation
Panaji Municipal CorporationDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Municipal Corporation पणजी महानगरपालिकेत तीस नगरसेवकांपैकी काही मोजकेच नगरसेवक आपल्या प्रभागातील समस्या मांडतात.

काही नगरसेवक महानगरपालिकेच्या कारभारावर बोट ठेवतात, तर गप्प बसणाऱ्यांची आणि केवळ बैठकीला कोरम पूर्ण दिसावा म्हणून हजेरी लावणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

नगरसेवकांच्या मानधनात झालेली वाढ पाहता किमान त्या मानधनाचा मान ठेवून तरी न बोलणारे नगरसेवक शहराच्या प्रश्‍नांवर तोंड उघडतील का? असा प्रश्‍न आहे.

तीस अधिक दोन स्वीकृत अशा 32 नगरसेवक संख्या असलेल्यांपैकी महापौर-उपमहापौर सोडल्यास इतर तीस नगरसेवकांत काही कारभारावर बोट ठेवतात, त्यात सुरेंद्र फुर्तादो, उदय मडकईकर, वसंत आगशीकर, ज्योएल आंद्रादे, निल्सन काब्राल यांचा त्यात समावेश आहे.

Panaji Municipal Corporation
Goa Excise Department: पेडणे घोटाळ्यानंतर अबकारी खाते अ‍ॅक्शनमोडवर; 'एवढ्या' मद्यालयांचे परवाने केले रद्द

त्याशिवाय आपल्या प्रभागाशिवाय काही महत्त्वाच्या प्रश्‍नावर बोलणाऱ्यांमध्ये शुभम चोडणकर, प्रमेय माईणकर, रुथ फुर्तादो, प्रसाद आमोणकर, कबीर पिंटो माखिजा, अस्मिता केरकर, विठ्ठल चोपडेकर अशा नगरसेवकांचा समावेश आहे. इतर नगरसेवक कधी चुकून बोलले तर ठीक अन्यथा हजेरी लावून परतण्याशिवाय त्यांच्याकडे काही विषयच नसल्याचे दिसते.

नव्याने निवडून आलेल्यांची संख्या अधिक असली तरी प्रश्‍न मांडण्यासाठी धाडस करणे अपेक्षित आहे. त्या-त्या वॉर्डातील नागरिक नगरसेवकांकडे काही समस्या घेऊन जात असतील, तर त्यांनी त्या समस्या मांडणे अपेक्षित आहे.

पण तसे काही होताना दिसत नाही, त्याशिवाय जर महानगरपालिकेच्या कारभारात किंवा इतर काही बाबींमध्ये दोष आढळला, तर त्यावर बोलणेही त्यांचे कर्तव्य आहे.

Panaji Municipal Corporation
Goa Fire : दवर्लीत फर्निचरच्या दुकानाला आग; सात लाखांची हानी

केवळ कोरम पूर्ण करण्यासाठी जा, असा नेत्याचा आदेश असल्यासारखे ते बैठकीला हजेरी लावतात आणि जातात. शहरातील नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून आपण बैठकीला येत आहोत, नागरिकांचे प्रश्न मांडून ते सोडविले पाहिजेत याचा विचार त्यांनी करण्याची गरज आहे.

Panaji Municipal Corporation
CM Pramod Sawant: सरकारी नोकरीचा हट्ट नको; कौशल्यावर भर द्या

सुरेंद्र फुर्तादो होतात उद्विगन!

आत्तापर्यंत नगरसेवकांना दहा हजार आठशे रुपये मानधन मिळत होते, आता सरकारने ते अठरा हजारांवर नेले आहे.

दररोज नगरपालिकेत येणे त्यांच्यासाठी बंधनकारक नसले, तरी समस्या मांडण्यासाठी किंवा बैठकीत विचारपूर्वक व अभ्यासपूर्ण मत मांडण्यास कोणीच अडविलेले नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो बैठकीत अनेकदा नगरसेवकांच्या गप्प बसण्याच्या भूमिकेवर उद्विग्न झालेले आहेत. असो अनेकजण सत्ताधारी गटाचे असल्याने हा प्रकार घडत असेल, पण प्रभागातील समस्यांवर तरी बोलायला काहीच हरकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com