Panaji Traffic : पणजीत मांडवी पुलावर ‘ओव्हरटेक’चा थरार!

समाज माध्यमात नेटकरींकडून संताप व्यक्त
Panaji Traffic
Panaji Traffic Dainik Gomantak

Panaji Traffic : मांडवी पुलावर रविवारी सकाळी ओव्हरटेक करून वाहतूक कोंडी निर्माण केल्याचा गोमंतकीय जनतेने समाजमाध्यमावर प्रतिक्रियांचा वर्षाव करून निषेध केला. अपघात आणि कोंडी टाळण्यासाठी लोकांनी जबाबदारीने आणि संयमाने वाहन चालवले पाहिजे, असे लोकांना वाटते.रविवारी सकाळी काही छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसृत झाली, ज्यात एक स्विफ्ट कार मांडवी पुलावर चुकीच्या लेनमध्ये ओव्हरटेक करताना दिसत होती. ज्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. समाजमाध्यमांवर लोकांनी या ओव्हरटेक करण्याच्या कृतीचा निषेध केला.

गायक अमित नाईक,म्हणाले की, वाहतुकीचे नियम पाळणे किंवा हेल्मेट घालणे हे जबाबदारीच्या भावनेने लोकांनी केले पाहिजे. पुलावर रस्त्याच्या चुकीच्या लेनने गाडी चालवणे अजिबात उचित नाही. त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो.

अलीकडे वाहतुकीचे उल्लंघन वाढले आहे आणि पर्यटक गाड्यांवर नाचताना, बेफामपणे वाहने चालवतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. गोव्यात कोणत्याही गोष्टीला परवानगी आहे असा गोव्याबद्दल चुकीचा समज असल्याने पर्यटक गोव्यात असे प्रकार करतात. कडक दंडासह नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाली तरच लोक नियम पाळू लागतील, असे नाईक म्हणाले.

Panaji Traffic
Goa Monsoon Update 2023: पावसाचा जोर कायम; लाखाे रुपयांच्या हानीसह जनजीवन विस्कळीत

दाबोळी येथील पूजा कामत या महिलेला वाटते की पुलांवर ओव्हरटेक करण्यामुळे जीवघेणे अपघात होण्याची शक्यता वाढते. जेव्हा कोणी पुलांवर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो किंवा व्यग्र रस्त्यावर स्टंट करतो तेव्हा ते इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालतात. जर कोणी असे नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास लोकांनी व्हिडिओ रेकॉर्ड करावा किंवा जवळच्या पोलिस स्थानकाला फोटो पाठवावा, जेणेकरुन संबंधितावर पोलिस कडक कारवाई करतील.

Panaji Traffic
Goa Road Accident: रस्ते अपघातांची मालिका सुरूच

पुलांवर आणि अरुंद रस्त्यावर ओव्हरटेक करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या लोकांमुळे इतर लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि विनाकारण उशीर होतो. ते पुढे म्हणाले की, अनेकवेळा अशा वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका अडकून पडत असल्याचे मी पाहिले आहे.

आशु टिकम, वास्को

पर्यटकांनी वाहन चालवताना संयम बाळगला पाहिजे. घाईघाईने आणि अधीरतेने वाहन चालवल्याने वाहतूक कोंडी आणि अपघात होतात. गोव्यात येणारे अनेक पर्यटक वाहनांवर नाचणे, गजबजलेल्या रस्त्यावर स्टंटबाजी करत असल्याचे दिसून आले आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी जबर दंड आकारला पाहिजे.

सोहन सबनीस, मडगाव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com