Margao Road Dainik Gomantak
गोवा

जुने दुभाजक रस्त्याखाली; मडगावचे रस्ते धोकादायक

रस्त्यावर दिशादर्शक पट्ट्यांचे रेखन नसल्याने अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: डांबराचा जुना थर न काढताच मडगावात रस्त्यावर हॉटमिक्स केल्याने जुने दुभाजक या थराखाली आले आहेत. वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याचे या रस्त्यावर आता अपघात वाढू लागले आहेत.

मडगावच्या रस्त्याचे हॉटमिक्सिंग करण्यात आले आहे; मात्र या रस्त्यावर दिशादर्शकाच्या पट्ट्या रेखण्यात न आल्याने येथे अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या पट्ट्यांचे रेखन लवकर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मडगाव उद्यानाच्या डाव्या बाजूला पादचाऱ्यांना जाण्यासाठी रस्त्यावर असलेले झेब्रा क्रॉसिंग नव्याने केलेल्या हॉटमिक्सिंगमुळे दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी रात्रीच्या वेळी अपघात होत आहेत. याबरोबरच कामत हॉटेलजवळ बसथांब्यासाठी असलेले डिव्हायडर हॉटमिक्सिंगमुळे रस्त्याची उंची वाढल्याने वाहनचालकाला स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे. तसेच रस्त्याची उंची वाढवण्यात आली असल्याने फुटपाथ आणि रस्ता समांतर पातळीवर आले आहेत. त्यामुळे एखादे वाहन कुठल्याही वेळी ओव्हरस्पिडने असल्यास या फुटपाथवर चढण्याची शक्यता आहे.

मडगावचे नगरसेवक महेश आमोणकर या बाजूने रात्रीच्या वेळी जात होते. दरम्यान येथे एकाला डिव्हायडर न समजल्यामुळे अपघात होऊन गंभीर दुखापत झाली होती, असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT