Uncle and niece from Taligao drowned Dainik Gomantak
गोवा

ताळगावच्या मामा-भाचीचा बुडून मृत्यू

कुडासे-दोडामार्ग येथील दुर्घटना : एका भाचीला वाचवण्यात मामाला यश

दैनिक गोमन्तक

पणजी/दोडामार्ग : कुडासे येथील बंधाऱ्यावर कुटुंबीयांसह आंघोळ करताना अचानक पाणी वाढल्यामुळे मामा आणि भाची दोघेही बुडाले. या दुर्घटनेत दुर्गावाडी-ताळगाव येथील प्रसिद्ध वकील विजय आनंद पाळयेकर आणि त्यांची भाची तनिशा ठाकूर या दोघांचा मृत्यू झाला.

शनिवारी सकाळी कुटुंबीयांसह कुडासे-दोडामार्ग येथे सहलीला गेलेल्या पाळयेकर कुटुंबावर अचानक संकट कोसळले. ॲड. विजय पाळयेकर (वय 55) यांचे कुडासे येथे नातेवाईक आहेत. आज सकाळी कुडासे येथील बंधाऱ्यावर पाळयेकर कुटुंबीय अन्य नातेवाईकांसह आंघोळ करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. विजय पाळयेकर हे पट्टीचे पोहणारे होते. त्यांनी प्रसंगावधान राखून आपल्या एका भाचीला वाहत्या पाण्यातून बाहेर काढले. दुसरी भाची तनिशा ठाकूर (वय 13) हिला पाण्यातून काढण्यासाठी गेले असता, ते तिच्यासह पाण्यात बुडाले. ॲड. विजय पाळयेकर हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे, सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, पत्नी आणि इतर सदस्य असा परिवार आहे.

अन्य एक महिला बचावली

कुडासे-दसई या ठिकाणी कॉजवेच्या खालच्या बाजूला गोव्यातील अनेकजण आंघोळीसाठी आले होते. जिथे दुर्घटना घडली, त्याच्या बाजूला कोरडे नदीपात्र आहे. तेथे सर्वजण जमा झाले होते. सुरवातीला काहीजण आंघोळीला उतरले. त्यावेळी पायाखालची वाळू सरकून एक महिला पाण्यात पडली आणि वाहू लागली. तिला इतरांनी बाहेर काढले.

वेळीच मदत मिळाली असती तर..

विजय पाळयेकर आणि तनिशा ठाकूर हे पाण्यात उतरले. मात्र, ते पुढे गेल्यावर पाण्याची खोली वाढली. शिवाय तिथे भोवराही होता. त्यामुळे ते पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले आणि ‘वाचवा वाचवा’ असे मोठ्याने ओरडू लागले. त्यावेळी काठावरचे लोकही आरडाओरड करत होते. शेवटी बराच वेळ ओरडूनही कुणीच पुढे न आल्याने ते दोघे बुडाले. वेळीच मदत मिळाली असती, तर कदाचित ते दोघे वाचले असते.

यशवंत देसाई यांची धाडसी कामगिरी

यावेळी लोकांची आरडाओरड ऐकल्यावर वानोशीहून सासोलीकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने तेथील बागेत काम करणाऱ्या यशवंत देसाई यांना कुणी तरी नदीत बुडत असल्याची माहिती दिली. त्यानंतर देसाई धावत नदीवर गेले. तिथे त्यांनी ते दोघे बुडालेल्या ठिकाणी शोधाशोध केली असता, त्यांना पहिल्यांदा पाळयेकर सापडले. त्यांना पाण्याबाहेर काढून काठावर ठेवले. त्यानंतर देसाई यांनी पुन्हा शोधाशोध केली असता, साधारण १५ मिनिटांनंतर त्यांना तनिशा आढळली.

अचानक पाणी वाढले आणि...

सोबतच्या लोकांनी पहिल्यांदा पाळयेकर यांना रुग्णवाहिकेतून आणि नंतर तनिशाला खासगी गाडीतून कासारवर्णे (पेडणे) येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. बंधाऱ्यात याठिकाणी खोलगट भाग होता. तसेच अचानक पाणी वाढल्यामुळे ही दुर्घटना घडली, असे स्थानिक सूत्रांनी सांगितले.

ताळगाव परिसरावर शोककळा

आज दुपारी ही घटना समजली आणि ताळगाव परिसरावर अचानक शोककळा पसरली. ॲड. विजय पाळयेकर हे दुर्गावाडी-ताळगाव येथील क्षेत्रपाल दामोदर देवस्थानचे माजी अध्यक्ष होत. भजन कलेतही त्यांचे प्रावीण्य होते. इतर सामाजिक उपक्रमांतही ते हिरीरीने सहभागी होत. सर्व प्रकारच्या खेळांमध्ये ते भाग घेत. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT