U-19 Goa Chess Competition 
गोवा

U-19 Goa Chess Competition: राज्यस्तरीय ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत मंदार, अस्मिता विजेते

देवेश, वालंका यांना उपविजेतेपद

किशोर पेटकर

U-19 Goa Chess Competition: राज्यस्तरीय ज्युनियर (U-19) बुद्धिबळ स्पर्धेत मंदार लाड याने खुल्या, तर अस्मिता रे हिने मुलींत विजेतेपद पटकावले. बार्देश तालुका बुद्धिबळ संघटनेने गोवा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने घेतलेली स्पर्धा धारगळ येथील शांतादुर्गा देवस्थान सभागृहात झाली.

खुल्या गटात मंदार लाड व देवेश नाईक यांचे समान सहा गुण झाले. टायब्रेक गुणांत मंदार अव्वल ठरला, तर देवेशला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आयुष शिरोडकर साडेपाच गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. अनिकेत एक्का, जी. माधवन, नवल सावंत, मयुरेश देसाई, चैतन्य गावकर, सरस पोवार, विपुल कदम यांना अनुक्रमे चौथा ते दहावा क्रमांक मिळाला.

वयोगटात श्रीनिक सिनारी, आर्यव्रत नाईक देसाई, विहान तारी, एथन सिल्वेरा, वर्धन मळीक, सिम्प्लिसियो व्हिएगस, वरद नागवेकर, आयुष नाईक, साहिल नाईक, एकांग मालवणकर, अवनीश चोडणकर व धीरज देसाई यांना बक्षीस मिळाले.

मुलींत विजेती ठरलेली अस्मिता रे पाच गुणांसह स्पर्धेत अपराजित राहिली. वालंका फर्नांडिस हिला चार गुणांसह उपविजेतेपद मिळाले, तर वैष्णवी परब, लिया सिल्वेरा, सय्यद मैझा, आर्या दुबळे, नव्या नार्वेकर, कनक प्रभू मोये, तनिशा नाईक देसाई, श्रमा मोरुडकर यांना अनुक्रमे तिसरा ते दहावा क्रमांक मिळाला. वयोगटात कृत्तिका अग्रवाल, ईश्वरी राऊत, विधी नाईक, वृषा मणेरकर, सिद्धी नाईक, संगीता तळर्णकर, सानिया मयेकर यांना बक्षीस देण्यात आले.

गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव आशेष केणी, खजिनदार विश्वास पिळर्णकर, स्पर्धेचे मुख्य आर्बिटर अरविंद म्हामल, शिरीष दिवकर, प्रभाकर शेट्ये, डॉ. सुशांत धुळापकर, सत्यवान हरमलकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT