Xelvona curchorem Goa suryakant desai 2015 murder case : शेळवण कुडचडे येथे फेब्रुवारी 2015 मध्ये मालमत्ता वादातून सूर्यकांत देसाई यांचा खून झाला होता. सात वर्षानंतर या प्रकरणात दोषी आढलेल्या आई-मुलाला 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि एक लाखाचा दंड ठोठावला आहे.
दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयात आज (सोमवारी) दोषींच्या शिक्षेवर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. न्यायालयाने शेवंती देसाई व त्यांचा मुलगा हेमंत यांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले आहे.
अधिकची माहिती अशी की, शेळवण, कुडचडे येथे 23 फेब्रुवारी 2015 रोजी सूर्यकांत देसाई यांचा खून झाला होता. सूर्यकांत यांच्या घरासमोरील जमिनीच्या वादातून ही घटना घडली होती. पुढे 2018 मध्ये शेवंती देसाई आणि तिचा मुलगा हेमंत देसाई यांच्यावर खुनाचे आरोप निश्चित करण्यात आले होते.
संरक्षक भिंत बांधण्यावरून सूर्यकांत देसाई आणि संशयितांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि शेवंती याचा मुलगा हेमंतने कुदळीने वार केल्याने सूर्यकांत यांचा मृत्यू झाला होता.
दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत आई शेवंती व मुलगा हेमंत यांना दोषी ठरवत, दहा वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, एक लाखांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी सहा महिन्यांची साधी कैद न्यायालयाने सुनावली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.