Yuri Alemao|Amit Patkar|Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: 'वैयक्तिक अजेंड्यासाठीच पक्षांतर'; गोवा काँग्रेसकडून फुटीर आमदारांचा निषेध

Amit Patkar: काँग्रेसमध्ये घातकी व पातकींना अजिबात थारा नाही असे सांगत अमित पाटकर यांनी जोरदार हल्लाबोल केला

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: काँग्रेस पक्षाने पक्षांतर करणाऱ्या आणि विश्वासघात करणाऱ्यांसाठी सर्व दरवाजे बंद केले आहेत. लोकशाही आणि संविधानाची हत्या करणाऱ्यांविरुद्ध न्याय मिळेपर्यंत आम्ही लढा देऊ. काँग्रेसमध्ये घातकी व पातकींना अजिबात थारा नाही, असे सांगत अमित पाटकर यांनी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आठ आमदारांच्या फुटीरपणावर जोरदार हल्लाबोल केला.

काँग्रेसच्यावतीने आज उत्तर गोव्यात कळंगुट व जुने गोवे, तर दक्षिण गोव्यात वास्को आणि मडगावात फुटीर आमदारांच्या विरोधात निषेध करण्यात आला.

काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊन आठ आमदारांनी भाजपमध्ये केलेल्या पक्षांतराला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचा एक भाग म्हणून फुटीर आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा व इतर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘९०० दिवसांनंतरही निकाल नाही’

युरी आलेमाव म्हणाले, आमदार फुटीप्रकरणी सभापती तवडकर यांनी ९० दिवसांत निकाल द्यायला हवा होता, पण ९०० दिवस ओलांडले तरी ते निकाल देत नाहीत. भाजप सरकार आदेश देतो तसे सभापती काम करतात. २०२७ मध्ये जे फुटीर आहेत, त्या सर्वांना जनता घरी पाठवतील. आमदार फुटले तेव्हाच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती, आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहोत. आमदार खरेदी किंवा विक्रीच्या गटात आम्ही मोडत नाही.

‘वैयक्तिक अजेंड्यासाठीच पक्षांतर’

भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली तर आपण पराभूत होणार, हे मायकल यांना माहीत होते. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मी काँग्रेस पक्ष कधीही सोडणार नाही व विकासासाठी आपण पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व पक्षांतर करणारे सामान्यांसाठी नव्हे, तर त्यांच्या वैयक्तिक अजेंड्यासाठी होते. सभापतींनी पक्षांतराच्या याचिकेवर लवकर निर्णय घ्यावा अन्यथा सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेईल. मला विश्वास आहे की हे आमदार अपात्र ठरतीलच. त्यांचा विलीनीकरणाचा युक्तिवाद फोल ठरेल, असे आमदार कार्लोस फेरेरा यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

SCROLL FOR NEXT