Panjim Theft News Dainik Gomantak
गोवा

Theft In Goa: पार्क केलेल्या वाहनातील सामान चोरणारे दोघे गजाआड

Theft In Goa: दोन दिवसांपूर्वी पणजीत पार्क करून ठेवलेल्या वाहनामधील किमती साहित्य तसेच 2 लाख रुपये रोकड मिळून सुमारे 9 लाखांचा ऐवज चोरीप्रकरणी पणजी पोलिसांनी हैदर रियाझ खान (30) व निझामुद्दीन महम्मद इसाक जालेदगर (24,मूळ कर्नाटक, दोघेही सध्या रा.बेतोडा - फोंडा ) या दोघांना अटक केली.

दैनिक गोमन्तक

Theft In Goa: दोन दिवसांपूर्वी पणजीत पार्क करून ठेवलेल्या वाहनामधील किमती साहित्य तसेच 2 लाख रुपये रोकड मिळून सुमारे 9 लाखांचा ऐवज चोरीप्रकरणी पणजी पोलिसांनी हैदर रियाझ खान (30) व निझामुद्दीन महम्मद इसाक जालेदगर (24,मूळ कर्नाटक, दोघेही सध्या रा.बेतोडा - फोंडा ) या दोघांना अटक केली.

चोरीसाठी वापरलेली गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. त्यांचा तिसरा साथीदार फरारी आहे. न्यायालयाने संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

गेल्या 7 तारखेला रात्री 10.30 ते पहाटे 4.20 च्या दरम्यान, चोरट्यांनी चोरी केली होती. हैदराबादेतील श्रीधर रेड्डी यांनी याबाबत तक्रार दिली होती. रेड्डी यांनी भाडेपट्टीवर रेंट ए कार घेतली होती. या कारमध्ये 4 बॅगा होत्या.

गाडीत साहित्य ठेवून ते जवळच कॅसिनोवर गेले होते. ते कारकडे परतले असता, गाडीची काच फोडून दारे उघडलेली आढळली. तसेच आतील बॅगा लंपास केल्या होत्या.

त्यात 5 लाख रुपये किमतीचे दोन मॅकबुक लॅपटॉप, सन ग्लासेस तसेच पाकिटामध्ये विविध एटीएम कार्डस् तसेच रोक़ड होती.

पोलिस उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी सांगितले की, पोलिस निरीक्षक निखील पालेकर यांनी ‘सीसीटीव्ही’च्या मदतीने शोध घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT