Goa School: एक दिवस ‘विनादप्तर शाळा’; ‘सीटीएन’ची अनोखी संकल्पना

Goa School: कुडचडे येथील श्रीमती चंद्रभागा तुकोबा नाईक विद्यालयात ‘विनादप्तर शाळा’ ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणली आहे.
Goa School
Goa SchoolDainik Gomantak

Goa School: कुडचडे येथील श्रीमती चंद्रभागा तुकोबा नाईक विद्यालयात ‘विनादप्तर शाळा’ ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणली आहे. आठवड्यातून एक दिवस मुले दप्तराविना शाळेत येणार व चार भिंतींच्या बाहेर पडून मुक्त वातावरणात, खुल्या वर्गात शालेय अभ्यासक्रमाबरोबरच जीवनाचा पाठ शिकणार आहेत. त्यामुळे मुलांत खुशीचे वातावरण आहे.

Goa School
Goa Accident Case: मडगाव-कुंकळ्ळी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी या विनादप्तर शाळा संकल्पनेतून अभ्यासक्रम शिकणार असल्याचे या शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार कोप्रे देसाई यांनी सांगितले.

लहान मुले पुस्तक, वह्या व इतर अवजड दप्तराच्या ओझ्याखाली दबली जातात. या ओझ्यामुळे मुलांची शारीरिक व मानसिक वाढ एकप्रकारे खुंटली जाते.

मुक्त वातावरणात बहरतील मुले

  • चार भिंतींच्या आड आठवड्यातील सहा दिवस पुस्तक, वही व फळा यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळे व विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणारी ही संकल्पना आहे.

  • आठवड्यातील शनिवार हा विनादप्तर शाळा संकल्पनेसाठी ठेवला आहे. यासाठी खास वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

  • शाळेच्या प्राथमिक विद्यार्थ्यांना रेल प्रवासात कोणती खबरदारी घ्यावी, रेल्वेचे तिकीट कुठे घ्यावे, प्लॅटफॉर्म तिकीट का घ्यावे व कसे घ्यावे. याचा पाठ दिला.

  • मुलांना टपाल कार्यालय, बँक, नगरपालिका, पंचायत व इतर कार्यालये कशी चालतात याची माहिती देण्यासाठी या शाळेचा उपयोग होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com