Covid-19 Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोरोनाचे दोन बळी; 112 नवे रुग्ण

एकूण बधितांची संख्या 882 वर

दैनिक गोमन्तक

एकीकडे पावसाचे थैमान आणि दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. कोरोनामुळे आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून अधिकच्या उपचारासाठी सात जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. ही गंभीर बाब आहे. गेल्या 24 तासांत 112 नवे बाधित सापडले असून संक्रमण दर 8.58 इतका झाला आहे. राज्यात गेल्या महिन्याभरापासून कोविड बाधितांच्या प्रमाण वाढतच आहे. सध्या एकूण बधितांची संख्या 882 झाली आहे. तसेच आज 191 जण कोविडमुक्त झाले आहेत. (Two victims of corona in Goa; 112 new patients )

साथीचे आजार टाळण्यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक

गोवा राज्यात गेल्या काही दिवसातील पावसाची मुसळधार पाहता राज्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या बरोबर पावसाचे पाणी साठून राहील्याने डेंग्यू सारख्या साथ ही फैलावण्याची शक्यता आहे. त्यामूळे नागरिकांनी सतर्क राहात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

गोव्यातील अनेक भागात एकाचवेळी तीस ते चाळीस डेंग्यूचे रुग्ण सापडल्याच्या घटना ताज्या आहेत. त्यामूळे हा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी कोरोना आणि डेंग्यू सारखे पावसाळ्यासोबत येणारे साथीचे आजार टाळण्यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक बनले आहे.

बेकायदेशीर चिरेखाणीत अडकला ट्रक

केपे : मिराबाग सावर्डे येथे बऱ्याच बेकायदेशीर चिरे काढण्याचा व्यवसाय चालतो या साठी कोणती ही शासकिय यंत्रणा, पर्यावरण विभाग यांची परवानगी नाही. केवळ व्यक्तीगत अर्थिक हीताने काही व्यक्ती यासाठी असे मार्ग अवलंबत आहेत. या पार्श्वभूमीवर आज दुपारी चिरे नेण्यासाठी आलेला ट्रक चिरे भरताना अचानक पाणी आल्याने पाण्याखाली गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: Goa Rain: पुन्हा पावसाचा इशारा!

SCROLL FOR NEXT