फोंडा: आपेव्हाळ-प्रियोळ येथील भुरट्या चोऱ्यांप्रकरणी स्थानिकांनी फोंडा पोलिसांना निवेदन दिल्यानंतर फोंडा पोलिसांनी त्वरित दखल घेत या भागातील भुरट्या चोरट्यांना पकडण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. रात्रीच्यावेळी भुरट्या चोरट्यांकडून चोरीचे प्रकार सुरु असल्याने या ठिकाणी पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी स्थानिकांनी केली होती, त्याला अनुसरून सध्या पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे. विशेष म्हणजे फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील 21 पैकी 16 चोऱ्यांचा तपास फोंडा पोलिसांनी लावला आहे. ( Police system activated in Priol to deal with thieves )
दिवसा तसेच रात्रीच्यावेळी या भागात म्हार्दोळ, फर्मागुढी पोलिस आऊट पोस्ट तसेच पोलिसांच्या पीसीआर व्हॅनला वरिष्ठ पोलिसांनी आदेश दिल्याप्रमाणे सध्या या भागात गस्त सुरू आहे. नागरिकांनी पोलिसांनाही तेवढेच सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या भागात राहणाऱ्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती मिळवण्यात येत आहे. भुरट्या चोऱ्यांत बाहेरील लोकांचा हात आहे काय, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता त्यासंबंधी चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रियोळ, आपेव्हाळबरोबरच फोंडा भागातील भाडेकरुंची माहिती गोळा करण्यात येत आहे.
फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत गेल्या वर्षभरात झालेल्या 21 पैकी 16 चोऱ्यांचा छडा लावण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे. पाच चोऱ्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, फोंडा पोलिस स्थानकात अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे तपासकामावर परिणाम होत आहे. त्यामुळे पुरेसा कर्मचारी वर्ग फोंडा पोलिस स्थानकाला देण्याची आवश्यकता आहे. असे मत यावेळी पोलीसांनी व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.