गोवा

Goa Crime: मुंबईच्या मुलीवर सांगेत बलात्कार, तर पेडणेतही तरुणीवर अत्याचार

राज्यात मागील पाच वर्षांत 343 लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांची नोंद

Rajat Sawant

Goa Crime News : राज्यात मागील पाच वर्षांत 343 लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांची नोंद झाले आहेत. यातील 238 गुन्हे 18 वर्षांखालील मुलींवर झाले आहेत. राज्यात 61 प्रकरणे 2018 मध्ये, 73 प्रकरणे 2019 मध्ये, 62 प्रकरणे 2020 मध्ये, 72 प्रकरणे 2021 मध्ये तर 2022 मध्ये 75 लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहेत.

यातील 12 प्रकरणे पोलिसांकडे प्रलंबित आहेत. तर 26 प्रकरणांत पोलिसांनी न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला आहे. या शिवाय 308 प्रकरणांत पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे

दरम्यान, लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या 2 वेगवेगळ्या घटना राज्यात उघडकीस आल्या आहेत. या घटनांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. यातील एक गुन्हा पेडणे पोलिसांत नोंद झाला आहे तर दुसरा सांगे पोलिसांत नोंद झाला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पहिली घटना ही पेडणे तालुक्यातून समोर येत आहे. एका युवतीला संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पिडीत युवतीने पेडणे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीच्या आधारे लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली संशयिताविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पेडणे पोलिस करीत आहेत.

तर दुसरी घटना सांगे तालुक्यातून समोर येत आहे. याप्रकरणातील पिडित युवती ही ठाणे मुंबई येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. संशयिताने ठाणे येथील युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला.

याबाबतची तक्रार पिडीत युवतीने सांगे पोलिसांत दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सांगे पोलिसांत संशयित युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT