Tirupati : धक्कादायक! मुख्यमंत्री देवदर्शन योजनेतून तिरुपतीला गेलेल्या गोव्यातील 75 वर्षीय महिलेचा मृत्यू

मंगळवारी वास्को येथून 900 भाविक तिरुपती दर्शनाला गेले होते
CM Dev Darshan Yatra scheme
CM Dev Darshan Yatra schemeDainik Gomantak

Vasco News : मुख्यमंत्री देवदर्शन योजनेखाली तिरुपतीला गेलेल्या एका महिलेचे निधन झाल्याची घटना घडली आहे. मृत महिला वास्को येथील असून गुरुवारी रात्री उशीरा ही बातमी गोव्यात येऊन धडकली आणि एकच गोंधळ उडाला.

मंगळवारी 900 भाविक वास्कोहून तिरुपतीला रवाना झाले होते. या 900 भाविकांच्या तुकडीला मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी शुभेच्छा देवून रवाना केले होते. तिरुपतीला गेलेल्या या तुकडीतील एका महिलेचे निधन झाले आहे.

CM Dev Darshan Yatra scheme
Vasco News : गोव्याचे भाविक चालले तिरुपतीला; आमदार संकल्प आमोणकरांनी दाखवला हिरवा झेंडा

मुख्यमंत्री देवदर्शन योजनेखाली तिरुपतीला गेलेल्या वास्को येथील कल्याणी काणकोणकर या 75 वर्षीय महिलेचे यात्रा स्थळीच गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. बालाजी दर्शनासाठी गोव्यातील भाविक पद्मावती देवळात गेले आताना ही घटना घडली.

कल्याणी काणकोणकर ही महिला अचानक देवळात कोसळली. यावेळी इतरांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण तिथे तिला डॉक्टरांनी मृत जाहीर केले. या घटनेची माहिती गोव्यात गुरुवारी रात्री उशीरा येऊन धडकली आणि एकच गोंधळ उडाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com