Gorakshak-Beef Traders Clash Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोरक्षक-मांसविक्रेत्यांमध्ये धुमश्चक्री!! परस्परविरोधी तक्रारी; दोघांना अटक

Gorakshak-Beef Traders Clash Fatorda: फातोर्डा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंद झाल्या असून सायंकाळी पोलिसांनी अफजल बेपारी व युनूस बेपारी या दोघांना अटक केली आहे.

Akshata Chhatre

फातोर्डा: एसजीपीडीए मार्केटात ३ बीफ विक्रेत्यांना मारहाण करण्याची घटना शनिवारी (२१ डिसेंबर) सकाळी घडली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा दावा विक्रेत्यांतर्फे करण्यात आला आहे. मारहाणप्रकरणी नंतर विक्रेत्यांनी फातोर्डा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली. या घटनेमुळे मार्केट परिसरात वातावरण तंग बनले होते. याप्रकरणी फातोर्डा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंद झाल्या असून सायंकाळी पोलिसांनी अफजल बेपारी व युनूस बेपारी या दोघांना अटक केली आहे. तिसरा संशयित माजीद बेपारी हा आहे.

याप्रकरणी किरण आचार्य हा तक्रारदार आहे तर अन्य एका तक्रारीत अफजल बेपारी हा तक्रारदार असून पोलिसांनी  किरण आचार्य, साईश मालवणकर व पावन जाधव यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. 

मारहाणीच्या घटनेत माजीद बेपारी, अफजल बेपारी, युनूस बेपारी हे तीन बीफ विक्रेते तसेच विरोधी गटातील किरण आचार्य व साई मालवणकर हे जखमी झाले. ते दोघेही बजरंग दलाशी निगडित आहेत, असा दावा विरोधी गटाकडून करण्यात आला. या सर्वांना उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोवा राज्य नोंदणीकृत एक वाहन बीफ घेऊन आले होते. त्यावेळी काही युवकांनी ते वाहन अडवून बीफ कुठून आणले याबाबत विचारणा केली. नंतर मारहाणीची घटना घडली. दरम्यान, फातोर्डा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नेथन आल्मेदा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली.

आम्हाला संरक्षण द्या!

आम्ही सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून व्यवसाय करीत आहेत. नाहक आम्हाला त्रास दिला जात असून, सरकारने आम्हाला संरक्षण द्यावे, अशी मागणी बीफ विक्रेते सलुद्दीन बेपारी यांनी फातोर्डा पोलिस ठाण्यासमोर पत्रकारांशी बोलताना केली.

गोरक्षकांवर हल्ला!

गोरक्षा दलाचे भगवान रेडकर यांनी सांगितले की बीफ घेऊन कर्नाटकातील गाड्या मडगावात आल्याची माहिती या गोरक्षकांना मिळाली होती. त्यानंतर ते तेथे गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यावेळी ही घटना घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ODI Cricket Worldcup: 2027 वर्ल्डकप शेवट! 'विराट-रोहित' नंतर वनडे क्रिकेट धोक्यात; प्रसिद्ध माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने माजली खळबळ

Cooch Behar Trophy 2025: डाव गडगडला! 6 विकेट्स 37 धावांत गमावल्या; उपांत्यपूर्व लढतीत गोव्याची निराशाजनक फलंदाजी

Madkai Fire News: ..आणि बघता बघता होत्याचे नव्हते झाले! मडकईत आगीचे थैमान; दागदागिने, कपडेलत्त्यांसह 10 लाखांचे नुकसान

Hill Construction Goa: डोंगर, टेकड्यांचा नाश रोखणार! मंत्री राणेंचे प्रतिपादन; 30% हून अधिक बांधकामांना मुभा देणार नाही

Goa Tree Cutting: झाडं तोडताय? सावधान! गोवा सरकारचे कडक निर्देश जारी; पारदर्शकतेसाठी नियमांत केले बदल

SCROLL FOR NEXT