रंग खेळताना बसला 'इलेक्ट्रीक शॉक'! होळीच्या उत्साहावर विरजण; झुआरीनगरातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Holi Tragic Death: होळीचा आनंदोत्सव साजरा करत असताना घडलेल्या दुर्दैवी घटनेत झुआरीनगर येथील एका तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
Electric shock death zuarinagar goa
Electric shock death zuarinagar goaDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: होळीचा आनंदोत्सव साजरा करत असताना घडलेल्या दुर्दैवी घटनेत झुआरीनगर येथील एका तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. दिलीप गौड (वय २७) असे मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झुआरीनगर परिसरात राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील रहिवाशांनी चार मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव साजरा केला. दिलीप गौडच्या निवासस्थानाजवळही स्थानिक रहिवासी रंगांची उधळण करत उत्साहात होळी खेळत होते. दुपारच्या सुमारास पाणी आणण्यासाठी दिलीपने तेथील सुमारे साडेसहा मीटर लांबीचा धातूचा पाईप उचलला आणि तो नळाला जोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्या ठिकाणावरून उच्च दाबाच्या वीजवाहिन्या गेल्या होत्या. दिलीपने पाईप वर उचलताच त्याचा थेट संपर्क या वीजवाहिन्यांशी आला. धातूचा पाईप असल्यामुळे विजेचा प्रचंड प्रवाह त्यातून गेल्याने दिलीपला जोरदार विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे तो जागीच कोसळला आणि त्याचा तत्काळ मृत्यू झाला.

Electric shock death zuarinagar goa
Goa Drowning Death: दारू पिऊन आंघोळ करायला गेला अन्... वाठादेव बंधाऱ्यात एकाचा बुडून मृत्‍यू

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली; मात्र तोपर्यंत दिलीपचा मृत्यू झाला होता. यानंतर वेर्णा पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

Electric shock death zuarinagar goa
Tragic Death: चिंचणी हादरले! भीषण आगीत अंथरुणाला खिळलेल्या वृद्धेचा होरपळून मृत्यू; परिसरात हळहळ

या घटनेमुळे झुआरीनगर परिसरात शोककळा पसरली आहे. होळीच्या उत्सवाच्या दिवशीच झालेल्या या दुर्घटनेमुळे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून उत्सव साजरा करताना सुरक्षिततेची काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com