Goa Crime: फातोर्ड्यात गोरक्षक- मांसविक्रेत्यांमध्ये हाणामारी; तीन जण जखमी

Gorakshak-Beef Traders Clash: काही क्षणातच वाद चिघळला आणि मांसविक्रेत्यांनी गोरक्षकांना मारहाण केली, यात तीन जण किरकोळ जखमी झाले.
Gorakshak-Beef traders Clash: काही क्षणातच वाद चिघळला आणि मांसविक्रेत्यांनी गोरक्षकांना मारहाण केली, यात तीन जण किरकोळ जखमी झाले.
Gorakshak-Beef Traders ClashDainik Gomantak
Published on
Updated on

Gorakshak-Beef Traders Clash Fatorda

फातोर्डा : गोव्यातील फातोर्ड्यात शनिवारी सकाळी तणाव निर्माण झाला. कर्नाटकमधून आलेल्या वाहनात गोमांस असल्याच्या संशयावरून गोरक्षकांनी वाहनचालकाची चौकशी केली. या वादातून गोरक्षकांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. यानंतर काही काळासाठी परिसरात तणाव निर्माण झाला, मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

फातोर्डा येथील दक्षिण गोवा नियोजन आणि विकासन प्राधिकरण म्हणजेच SGPDA मार्केट येथे कर्नाटकातून आलेले वाहन थांबले होते. या वाहनात गोमांस असल्याचा संशय आल्याने गोरक्षकांनी वाहन चालकाकडे चौकशी केली. या वादात मार्केटमधील मांसविक्रेत्यांनी उडी घेतली. काही क्षणातच वाद चिघळला आणि मांसविक्रेत्यांनी गोरक्षकांना मारहाण केली. यात तीन जण किरकोळ जखमी झाले.

मांसविक्रेत्यांचा आरोप

सलाउद्दीन नावाच्या एका विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार सकाळी दुकान उघडताच गोरक्षक दलाच्या काही माणसांनी त्याला गाडी उघडून दाखवण्याची जबरदस्ती केली, त्याने या जबरदस्तीला न जुमानता त्यांना विरोध केला असता गोरक्षकांनी सलाउद्दीन सोबत असलेल्या कामगारांवर चाकूने वार केले आणि सोबतच पैश्यांची मागणी केली.

Gorakshak-Beef traders Clash: काही क्षणातच वाद चिघळला आणि मांसविक्रेत्यांनी गोरक्षकांना मारहाण केली, यात तीन जण किरकोळ जखमी झाले.
Illegal Beef Seized: बोरीत दोन टन गोमांस जप्त; वाळपईतील गोप्रेमीमुळे उघडकीस आला प्रकार

पैसे न दिल्यास गाडी पुढे जाऊ देणार नाही अशी धमकी देखील गोरक्षक दलाच्या माणसांनी दिल्याची माहिती सलाउद्दीनने दिली आहे. घडलेल्या प्रसंगानंतर मांस विक्रेत्यांकडून पोलिस संरक्षणाची मागणी केली जातेय. घटनेची माहिती मिळताच गोवा पोलिसांचे पथक मार्केट परिसरात पोहोचले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर मार्केट परिसरातील मांसविक्रेत्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे. गोरक्षकांनी व्यवसायात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विक्रेत्यांनी केला आहे.

गोरक्षक दलाचे म्हणणे काय?

गोरक्षक दलाकडून मत व्यक्त करताना भगवान रेडकर याने घटनेची दुसरी बाजू उलघडून दाखवली आहे. भगवान रेडकरच्या म्हणण्यानुसार गोरक्षक दलाच्या माणसांनी कुठल्याही गाडीला किंवा दुकानाला हात लावलेला नाही. याउलट जेव्हा गोरक्षक दलाची माणसं झडती घ्यायला गेली तेव्हा त्यांच्यावर समोरून हल्ला करण्यात आला. पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी रस्त्यावर आलेल्या गोरक्षकांवर मांसविक्रेत्यांनी हल्ला चढवला, यामध्ये गोरक्षक दलाची दोन माणसं जखमी झाली आहेत, ज्यांच्यावर उपाचार सुरु असून संपूर्ण पुराव्यांसह पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात येईल अशी माहिती भगवान रेडकर याने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com