

पणजी: एका गर्भवती महिलेला अश्लील व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप असलेल्या महाराष्ट्र येथील एका मूकबधीर व्यक्तीला म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश रिना फर्नांडिस यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. आरोपीविरोधात पणजी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली होती. आरोपी १८ दिवसांपासून कोलवाळ कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.
२७ जानेवारी २०२६ रोजी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. पतीच्या तक्रारीनुसार, ३ नोव्हेंबर २०२५ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीला व्हॉट्स ॲपवर वारंवार व्हिडिओ कॉल केले.
या कॉलदरम्यान आरोपीने अश्लील वर्तन केले. गुप्तांग दाखवले आणि अश्लील व्हिडिओ संदेश पाठवल्याचा आरोप करण्यात आला होता. मोबाईल टॉवर लोकेशन आणि सीम कार्डच्या माहितीवरून संशयित बीड (महाराष्ट्र) येथील असल्याचे निष्पन्न झाले.
गोव्याचे पोलिस पथक महाराष्ट्रात गेले असता संशयित स्वतःहून तपासासाठी गोव्यात येण्यास तयार झाला. त्याच्या फोनमध्ये दोन व्हॉट्स ॲप अकाऊंट्स आढळले. त्यावरून पीडितेच्या क्रमांकावर अनेक वेळा कॉल केल्याचे समोर आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.