Goa Police: 55 पोलिस कर्मचाऱ्यांना डीजीपी इन्सिग्निया पुरस्कार! स्थापनादिनानिमित्त मुख्यालयात रंगला कार्यक्रम

DGP Insignia Awards Goa: ५५ पोलिस कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट पोलिस सेवेसाठी डीजीपी इन्सिग्निया पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच तीन सर्वोत्कृष्ट पोलिस स्थानकांनाही चषक तसेच रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
Goa police
dgp insignia awards goaDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim police headquarters DGP insignia awards

पणजी: अमलीपदार्थप्रकरणी गोवा पोलिसांनी यावर्षी राज्यभरात १५४ प्रकरणे नोंद करून १७८ जणांना अटक केली व सुमारे ९ कोटींचा ड्रग्ज जप्त केला. मोटार वाहन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे ५ लाख चालकांविरोधात कारवाई करून सुमारे ३० कोटींचा दंड वसूल केल्याची माहिती पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिली

तसेच सुमारे ३७ हजार विद्यार्थ्यांना तसेच ४४ हजार चालकांसाठी वाहन नियमांसंदर्भात शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तपासकाम टक्केवारी ८८.३८ टक्के असल्याचे महासंचालकांनी सांगितले.

पोलिस स्थापनादिनानिमित्त पणजीतील पोलिस मुख्यालयात आयोजित करण्यात महासंचालक कुमार बोलत होते. यावेळी खात्याचे अधिकारी तसेच माजी पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी ५५ पोलिस कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट पोलिस सेवेसाठी डीजीपी इन्सिग्निया पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच तीन सर्वोत्कृष्ट पोलिस स्थानकांनाही चषक तसेच रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यामध्ये वास्को, म्हापसा व पर्वरी याचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात पोलिस परेडने झाली. या परेडचे नेतृत्व पोलिस उपअधीक्षक विश्‍वेश कर्पे यांनी केले.

गेल्या काही महिन्यात देशभराबरोबरच राज्यातही सायबर क्राईमच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे हा कक्ष अधिक सक्षम करण्यात आला असून १५ प्रकरणांचा छडा लावून ३८ जणांना अटक करण्यात यश आले आहे. सायबर क्राईम प्रकरणांविरोधात सायबर क्राईम कक्षाने धडक कारवाई सुरू करून बोगस मोबाईल क्रमांकावरून होत असलेली खाती गोठविण्यात आली आहे.

चार पोलिस चौकींना नव्या इमारती

२०२४-२५ या काळात पोलिस खात्यातर्फे साधनसुविधा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्यात सांगे व जुने गोवे पोलिस स्थानक इमारत तसेच केरी व चोडण पोलिस चौकीचा समावेश आहे. या व्यतिरिक्त आल्तिनो-पणजी व मायणा-कुडतरी येथे पोलिस वसाहत इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. पणजी पोलिस मुख्यालयात नवीन प्रशासकीय इमारतीचे काम केले जाणार आहे.

Goa police
Goa Unemployment: 'बेरोजगारीचा प्रश्न सोडवला नाही तर गोव्याची अवस्था..'; शेर्पा अमिताभ यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच दिला इशारा

३०२ पोलिसांना बढत्या

पोलिस खात्यातील ३०२ पोलिस कर्मचाऱ्यांना बढती देण्यात आली आहे, तर १३६१ पोलिस कर्मचाऱ्यांना बढतीची वेतनश्रेणी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ३३६ पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात आले आहे.

Goa police
South Goa Crime: दक्षिण गोव्यात वर्षभरात 65 गंभीर गुन्ह्यांची नोंद; तपास लावण्‍याची टक्‍केवारी 95 टक्‍के; वाचा संपूर्ण रिपोर्ट

खेळातही गोवा पोलिसांंची चमक

गोवा पोलिस तपासकामाबरोबरच खेळातही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. गोवा पोलिस क्रिकेट संघाने यंदा बांदोडकर चषक २०२४ पहिल्यांदाच पटकाविला आहे. पोलिस कबड्डी संघानेही गोवा स्तरीय चॅम्पयनशिप स्पर्धा जिंकल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com