COVID-19 GOA  
गोवा

Goa Corona Update: आणखी 2 कोरोना रूग्ण दगावले, 72 नव्या रूग्णांची नोंद

मागील पाच दिवसांत सहा रूग्णांचा मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांचा मृत्यू होत आहे. आज (दि.29) आणखी दोन कोरोना रूग्ण दगावले असून, मागील पाच दिवसांत सहा रूग्ण दगावले आहेत. आज दिवसभरात गोव्यात 72 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर, 98 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला गोव्यात 873 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 2 लाख 55 हजार 968 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 लाख 51 हजार 132 जण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 98.11 टक्के एवढा झाला आहे. आज दिवसभरात 559 प्रयोगशाळा नमुने तापसले आहेत.

मागील दोन दिवसांपासून गोव्यात नव्यानं वाढ होणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे. पण, दररोज रूग्ण दगावत आहेत. सलग पाच दिवसात गोव्यात सहा कोरोना रूग्ण दगावले आहेत. आज दोन तर मागील चार दिवस प्रत्येकी एक रूग्ण दगावला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर गोव्यात रूग्ण दगावत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT