बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने (Bollywood Actor Ranvir Singh) काही दिवसांपूर्वी एका मासिकासाठी न्यूज फोटोशूट (Controversial Photoshoot) केले होते. रणवीर सिंगचे हे फोटोशूट चांगलेच वादाच्या भवऱ्यात सापडले होते. अनेकांना रणवीर सडकून टिका केली, याच प्रकरणी त्याच्यावर एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. अभिनेता रणवीर सिंग याप्रकरणी आज चौकशीसाठी हजर राहिला. पोलिसांनी दोन तास रणवीरची चौकशी केली.
मुंबई पोलिसांनी 30 ऑगस्ट रोजी रणवीर सिंगला जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते, मात्र रणवीर सिंग आज सकाळी 7.30 वाजता पोलीस ठाण्यात पोहोचला. रणवीरने आज आपला जबाब नोंदवला. मला कल्पना नव्हती की अशा फोटोशूटमुळे त्याच्यासाठी त्रास होईल. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. असा जबाब रणवीर सिंगने नोंदविला आहे.
फोटोशूट प्रकरणी पोलिसांनी रणवीरला दोन वेळा समन्स पाठवला होता. मात्र तो पोहोचला नाही, आज सकाळी रणवीर त्याच्या कायदेशीर टीमसह चेंबूर पोलीस ठाण्यात पोहोचला आणि दोन तास पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला. पोलिसांनी चौकशी दरम्यान रणवीरला अनेक प्रश्न विचारले, उदाहरणार्थ, न्यूड फोटोशूटसाठी कोणत्या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट होते, फोटोशूट कधी आणि कुठे केले, तुम्हाला माहिती आहे का की अशा शूटमुळे लोकांच्या भावना दुखावू शकतात.
पुढील तपासात देखील पोलिसांना सहकार्य करू, असे रणवीर सिंग आणि त्याच्या टीमने म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.