Gas Cylinder  Dainik Gomantak
गोवा

Cylinder Blast In Bambolim: बांबोळीत दोन सिलिंडरचा स्फोट; मजुरांच्या झोपडपट्टीला भीषण आग

Cylinder Blast In Bambolim: स्फोट झालेल्या परिसरात मजुरांच्या झोपड्या आहेत.

Pramod Yadav

Cylinder Blast In Bambolim

बांबोळीत दोन घरगुती सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली असून, परिसरातील काही घरांना आग लागल्याची माहिती आहे. स्फोट झालेल्या परिसरात मजुरांच्या झोपड्या आहेत.

आगीत मोठी हानी झाली नसली तरी आगीमुळे धुराचे लोळ हवेत पसरले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

बांबोळी येथे मजुरांच्या काही झोपड्या आहेत, याठिकाणी सुमारे १४० झोपड्या असून, यातील १० ते १२ झोपड्यांना आग लागल्याची माहिती पोलिसांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास मिळाली. आग पसरल्यानंतर येथील दोन एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

दरम्यान, घटनास्थळी पणजी अग्निशमन दलाचा आणि इतर एक बंब दाखल झाला आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु झाले. यावेळी लगतच्या इतर झोपड्यांमधून सिलिंडर बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शॉर्ट सर्किट अथवा दिवा पेटवल्याने आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका झोडपीत दोघे ते तिघेजण राहत असल्याची महिती असून, सुमारे ४० ते ५० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT