Dhargal Fatal Accident: धारगळ अपघात प्रकरणात अखेर खूनाचा गुन्हा दाखल

Dhargal Fatal Accident: धडक दिल्यानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला.
Accident
AccidentDainik Gomantak

Dhargal Fatal Accident

दाडाचीवाडी - धारगळ येथे रविवारी (दि.१२ मे) रात्री दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. वाळुने भरलेल्या टेम्‍पो रिक्षाने स्कूटरला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असता, त्याला मृत घोषित करण्यात आले.

हा अपघात नसून खून असल्याचा दावा स्थानिकांनी केल्यानंतर आज (मंगळवार) अखेर पेडणे पोलिसांनी या प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दाडाचीवाडी - धारगळ येथे झालेल्या अपघातात देविदास ऊर्फ देऊ चंद्रकांत कोनाडकर (४५, दाडाचीवाडी) यांचा मृत्‍यू झाला.

टॅक्सी व्यावसायिक असलेले देविदास नागझर येथून आपल्या घरी जात असताना दाडाचीवाडी - धारगळ येथे अज्ञात टेम्‍पो रिक्षाने त्यांना धडक दिली. धडक दिल्यानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला.

दरम्यान, घटनास्थळी टॅक्सी चालक आणि इतर स्थानिकांनी रास्ता रोको करत मार्ग अडवून धरला. तसेच, हा अपघात नसून खून असल्याचा दावा देखील केला.

Accident
Cylinder Blast In Bambolim: बांबोळीत दोन सिलिंडरचा स्फोट; मजुरांच्या झोपडपट्टीला भीषण आग

समोर आलेल्या माहितीनुसार, मृत देविदास आणि संशयित रिक्षा चालक व इतर तीन जणांमध्ये रोड रेजवरुन वाद झाला होता. यातून रागवलेल्या रिक्षा चालकाने देविदास यांचा पाठलाग करुन मागून दुचाकीला धडक दिली व घटनास्थळावरुन पळ काढला.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या देविदास यांचा मृत्यू झाला, स्थानिकांनी याप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी लावून धरत, संशयिताच्या अटकेची मागणी केली. पोलिसांच्या आश्वासनानंतर स्थानिकांनी मार्ग मोकळा केला होता.

दरम्यान, आज अखेर पेडणे पोलिसांनी याप्रकरणात खूनाचा गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com