Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: गवंडाळी-खोर्ली येथे रिक्षा-दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

रिक्षा चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Accident: गवंडाळी-खोर्ली येथे काल रात्री रिक्षा व दुचाकीमध्ये काल रात्री झालेल्या अपघातात दुचाकीवरील विजय सावळो गावडे (40) व प्रशांत उत्तम गावडे (30) या दोघा चुलत भावांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी अपघाताची नोंद करून रिक्षा चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

जुने गोवे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फणसवाडा - नावेली येथील दोघेही चुलत भाऊ हे काल रात्री खोर्ली येथे आपल्या नातेवाईकांकडे गवंडाळी येथील रस्त्याने जात होते. यावेळी समोरून रिक्षा येत होती.

गवंडाळी येथे जाणारा रस्ता अरुंद असल्याने भरधाव वेगात असलेल्या या दुचाकीने रिक्षाला समोरून धडक दिल्यानंतर सोनाली पिंटो घराजवळ असलेल्या संरक्षक भिंतीला त्या दोघांचे डोके आपटले.

त्यामुळे दोघांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्या दोघांना रुग्णवाहिकेने गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले. तथापि, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी रिक्षा चालक शिवलिंग रामा नाईक (40 वर्षे, कुंभारजुवे) याच्याविरुद्ध भादंसंच्या कलम 279, 304 (अ) खाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Goa Live News: वाळपईत वाहतूक कोंडी

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

डिचोलीच्या दहीहंडीत आमदारांनी धरला ठेका, Video Viral!

SCROLL FOR NEXT