Vagator Fire  Dainik Gomantak
गोवा

Vagator: वागातोर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट, दोन गाळे जळून खाक; अडीच लाखाचे नुकसान

सिलेंडरच्या स्फोटात दोन स्टॉल जळून खाक झाले आहेत.

Pramod Yadav

वागातोर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठा अपघात झाला आहे. या स्फोटात दोन स्टॉल जळून खाक झाले आहेत. यामध्ये एका स्टॉल मालकाचे पन्नास हजार तर, दुसऱ्या स्टॉल मालकाचे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. आज (शुक्रवारी, दि.23) पहाटे पाच वाजता ही घटना घडली.

म्हापसा अग्निशमन दलाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, वागातोर येथील Antaraez परिसरात दोन गाळ्यांना पहाटे आग लागली. म्हापसा अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळताच एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत स्टॉलधारक ज्ञानेश्वर चिमुलकर आणि संतोष आंबेकर यांच्या स्टॉलचे अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये साठ हजार रूपयांचे नुकसान होण्यापासून बचाव करण्यात आला.

ज्ञानेश्वर सावंत, नितीन चोडणकर, हितेश परब आणि गिरीश गवस या अग्निशमन जवांनानी या कारवाईत सहभाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Defamation Case: कॅप्टन कूल कोर्टात 'टॉस' हरला? 100 कोटींच्या मानहानी प्रकरणात 10 लाख भरण्याचे आदेश

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ बंद होणार? खासदार फर्नांडिस यांच्या दाव्यानं खळबळ, युरी-सरदेसाई आक्रमक; जनआंदोलनाचा दिला इशारा

VIDEO: "भारताला चार गुजराती चालवतायेत, त्यापैकी दोन देश विकतायेत...'' हाय-होल्टेज सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त वक्तव्य

एक्झिट परमिट संपलं तरी भारतातच मुक्काम! 3 परदेशी नागरिकांवर कारवाई; म्हापसा डिटेंशन सेंटरमध्ये केली रवानगी

Budhaditya Rajyog 2026: कष्टाचं होणार सोनं...! बुधादित्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; भाग्याचीही मिळणार साथ

SCROLL FOR NEXT