Drunk Tourist at Corgao in Goa Dainik Gomantak
गोवा

Drunk Tourist in Goa: पेडण्यातील कोरगाव येथे मद्यधुंद पर्यटकांचा गोंधळ; पोलिसांना अरेरावी

व्हिडिओ व्हायरल

Akshay Nirmale

Drunk Tourist chaos in Goa: गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या दोन पर्यटकांनी रविवारी मद्यधुंद अवस्थेत पोलिसांशी हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पेडण्यातील कोरगाव येथे ही घटना घडली आहे.

या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.

या दोन्ही पुरूष पर्यटकांनी रेंट अ कार सेवेतून कार घेतली होती. GA 06 T 8332 या कारमधून त्यांनी गोवा दर्शन केले आहे. दरम्यान, त्यांनी जास्त प्रमाणात मद्य प्राशन केले होते. पोलिसांनी त्यांची कार अडवल्यानंतर त्यातील एकाने पोलिस कॉन्स्टेबललाच अरेरावी केली.

पोलिस स्टेशनमध्ये न्या, पण दादागिरी करू नका, असे बरळताना ते पर्यटक दिसतात. यावेळी तिथे महिला पोलिसदेखील होत्या. त्यांच्याकडेही ते संबंधित पोलिसांची तक्रार करताना दिसतात.

तथापि, हे दोन्ही पर्यटक मोठ्या प्रमाणात दारू पिल्याने मद्याच्या अंमलाखाली असल्याचे व्हिडिओतून स्पष्ट दिसते. या दोन्ही पर्यटकांनी सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला.

तसेच या सर्व प्रकाराचा व्हिडिओ करणाऱ्यालाही ते अरेरावी करताना दिसतात. या सर्व प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत होती. गोव्यात येऊन अशा पद्धतीचे वर्तन करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

Goa Live News: साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

Basketball World Championship: गोव्याचा जेशुआ भारताच्या प्रतिनिधित्वासाठी सज्ज, 19 जूलैपासून रंगणार जागतिक विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा

SCROLL FOR NEXT