Goa Shipyard News: जहाज बांधणीसाठी AI चा वापर; गोवा शिपयार्डचा इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्ससोबत सामंजस्य करार

मालमत्ता संरक्षण, अपघातात घट करण्याचे उद्दिष्ट
Goa Shipyard
Goa ShipyardDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Shipyard News: गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) ने बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. दोन्ही संस्था मिळून जहाजबांधणी आणि संरक्षण क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान विकसित करणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Goa Shipyard
Vijai Sardesai: कुजलेला हात सापडलेल्या ठिकाणाची विजय सरदेसाई यांनी केली पाहणी; विधानसभेत मांडणार मुद्दा

IISc ची फाउंडेशन फॉर सायन्स इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट (FSID) ही संस्था संरक्षण क्षेत्रातील जहाज बांधणींसाठीची प्रक्रिया आणखी सुलभ आणि सुव्यवस्थित करण्याचा विचार करत आहे. बांधकाम कालावधी कमी करण्यासह एकूण उत्पादकता वाढवण्यावर विचार केला जात आहे.

FSID पुढील एका वर्षात GSL सोबत जहाजबांधणीतील गंभीर आव्हानांना सामोरे जाण्यासाठी AI च्या सामर्थ्याचा उपयोग करून युद्धनौका आणि शस्त्रास्त्रे एकत्रीकरणामध्ये नाविन्यपूर्ण प्रक्रिया विकसित करण्यासाठी काम करेल.

Goa Shipyard
Vijai Sardesai: वनमंत्र्यांचा जीभेवरील ताबा सुटलाय; सरदेसाईंची विश्वजीत राणेंवर टीका

या करारामुळे दोन्ही संस्थांच्या कौशल्याचा वापर एकत्रितपणे करता येणार आहे. हे सहकार्य मनुष्यबळ आणि उपकरणांची उत्पादकता वाढवणे, अत्याधुनिक सुरक्षा उपाय लागू करणे, संरक्षण सज्जता मजबूत करणे आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणारे असेल.

AI-संचलित भविष्यसूचक विश्लेषणे आणि रीअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टमच्या अंमलबजावणीवर यातून लक्ष दिले जाणार आहे. कामाची सुरक्षित परिस्थिती सुनिश्चित करणे, अपघात कमी करणे आणि कर्मचारी आणि मालमत्तेचे रक्षण करणे, हे यामागिल उद्दिष्ट आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Ease of Doing Business Law
Goa Dairy management takeover by NDDB
Goa Bahrain Cricket Agreement
India Defence Procurement DAC Approves
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com