Goa Bike Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: भीषण अपघातांमध्ये दोघे ठार; दोघा चालकांना अटक

Accident At Usgao Tisc And Virdi Amona Bridge: दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार ठार झाले

गोमन्तक डिजिटल टीम

विर्डी-आमोणे पुलावर तसेच उसगाव तिस्क या दोन वेगवेगळ्या ठिकाणी आज झालेल्या भीषण अपघातांमध्ये ट्रकचालकांनी दुचाकीस्वारांना ठोकरले. यात दोघेही दुचाकीस्वार ठार झाले. पोलिसांनी दोन्ही घटनांमधील चालकांना अटक केली आहे.

विर्डी-आमोणे पुलावर ट्रकने ठोकरल्याने झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला. मोटारसायकलला ठोकरून ट्रकचालकाने ट्रकसह पलायन करण्याचा प्रयत्न केला असता, अपघातस्थळावरून साधारण दोन किलोमीटर अंतरावर ट्रकसह ट्रकचालकाला पकडण्यात पोलिस आणि स्थानिकांना यश आले. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.

मृत दुचाकीस्वाराचे नाव दिनेश जल्मी (वय ५५ वर्षे) असे असून, तो व्यवसायाने पायलट होता. दिनेश याच्या घरापासून काही अंतरावरच आज सायंकाळी ४.३० वाजता हा अपघात घडला. दिनेश जल्मी हे एकाला आणण्यासाठी आमोणे येथे जात होते. ते विर्डी-आमोणे पुलावर पोचताच समोरून येणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला जोरात धडक दिली.

या धडकेबरोबरच दिनेश जागीच गतप्राण झाले. ट्रकचालक ट्रकसह पसार झाल्याचे समजताच संतप्त स्थानिकांनी ट्रकचा पाठलाग केला. पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. वाटेत ट्रक पकडण्यात यश आले. ट्रक मडगाव येथील असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवला आहे. दिनेश जल्मी यांना दोन लहान मुले असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, उसगाव-कसल्ले या गावातून उसगाव बाजारात सुभेलाल हा मित्र धर्मेंद्र याला सोडण्यासाठी जात असता समोरून येणाऱ्या खडीची वाहतूक करणाऱ्या ट्र्कची धडक दुचाकीला बसली. चालकासह दुचाकी रस्त्यावरच आडवी झाली. यावेळी सुभेलाल जागीच ठार झाला. धर्मेंद्र याच्यावर उपचार करून त्याला घरी पाठविले, तर सुभेलालचा मुलगा साईश पिळये-तिस्क येथील इस्पितळामध्ये उपचार घेत आहे.

फोंडा पोलिसांनी पंचनामा करून मृत सुभेलालचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथे पाठवला आहे. याप्रकरणी ट्रकचालक वैकुंठ नीळकंठ नाईक (वय ५४ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

अंगावर शहारे आणणारे दृश्‍य :

उसगाव-तिस्क येथील अपघातात भरधाव ट्रकने दुचाकीला ठोकरले. यावेळी दुचाकीस्वार सुभेलाल याच्या डोक्यावरून ट्रकचे पाठीमागील चाक गेल्याने तो जागीच ठार झाला, तर त्याच्या पाठीमागे बसलेला त्याचा मुलगा साईश आणि मित्र धर्मेंद्र हा जखमी झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT