Tuyem Water Bill Issue Dainik Gomantak
गोवा

Water Bill Issue: 260 रुपये येणारे पाणीबिल 4000 कसे येते? तुयेतील ग्राहकांत प्रचंड नाराजी; 4 महिन्यांचे बिल एकत्र दिल्यानेच गोंधळ

Tuyem Water Bill Issue: चार ते पाच हजार रुपयांचे एकत्रित बिल आले तर ते कसे भरणार, असा सवाल तुयेचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच नीलेश कांदोळकर यांनी उपस्थित केला.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: पाण्याची बिले चार-पाच महिन्यांची एकत्रित येत असल्यामुळे सामान्य ग्राहकांना ती एकाच वेळी भरता येणार नाहीत. रोजंदारीवर कामासाठी जाणारे ग्राहक एकदम चार-पाच महिन्यांचे चार ते पाच हजार रुपयांचे एकत्रित बिल आले तर ते कसे भरणार, असा सवाल तुयेचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच नीलेश कांदोळकर यांनी उपस्थित केला.

तुये पंचायत क्षेत्रातील काही ग्राहकांना पाण्याची बिले चार ते पाच महिन्यांची एकत्रित दिल्यामुळे ग्राहकांत नाराजी पसरली आहे. माजी सरपंच नीलेश कांदोळकर यांनी पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन यावर चर्चा केली. नीलेश कांदोळकर यांनी सांगितले, की तुये पंचायत क्षेत्रात चार ते पाच महिन्याची एकत्रित बिले आल्यामुळे लोकांची धांदल उडालेली आहे.

एकाच वेळी जे रोजंदारीवर कामाला जातात. त्यांना भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे सरकारने उपाययोजना करून यापुढे नियमित दर महिन्याला बिले द्यावीत, अशी मागणी केली. पाणी ग्राहकाला जी चार-पाच महिन्यांची बिले एकत्रित आलेली आहेत, त्यांना तीन हप्त्यांमध्ये ते बिल पाणी विभागाकडे भरता येते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यापुढे दर महिन्याला बिल मिळेल!

पाणी विभागाचे काही कर्मचारी जे मीटर रीडर असतात त्यांना सरकारने निवडणूक कामे इतर कामासाठी घरोघरी पाठवले जाते. किंवा इतर अहवाल तपशील देण्याचे हे काम त्यांच्याकडे सुपूर्द केले जाते. म्हणून दर महिन्याला बिले देताना पाणी विभाग खात्याला अडचणी येत आहे, अशी कैफियत अधिकाऱ्यांनी यावेळी मांडली. यापुढे नियमित दर महिन्याचे बिल दिले जाईल, असे अधिकारी मेल्टन यांनी सांगितले.

दरमहा २६० येणारे बिल ४ हजारांचे कसे?

पाणी ग्राहक हरमलकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना आपल्याला सुरुवाती २६०, ३०० रुपये दर महिन्याला बिल यायचे. परंतु आज चार महिन्याचे बिल तब्बल ४ हजार रुपयांपेक्षा जास्त कसे काय ?असा सवाल करून हे बिल भरणे ही परवडणार नाही. महिन्याला तीनशेच्या आसपास येणारे बिल पाच महिन्यांला एवढे कसे काय आले? असा सवाल हरमलकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT