Tuyem hospital demand Dainik Gomantak
गोवा

Tuyem Hospital: '100 कोटी खर्चून बांधलेले हॉस्पिटल का सुरु नाही'? पेडण्‍यात उद्रेक; तुये इस्पितळ कृती समितीचे साखळी उपोषण

Tuyem Hospital Demand: समितीचे अध्यक्ष जुझे लोबो यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पेडणे तालुक्यासह शेजारील तालुक्यांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: तुये येथे सुमारे १०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या इमारतीत गोमेकॉशी संलग्नित इस्पितळ तातडीने सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी तुये इस्पितळ कृती समितीतर्फे पेडणे सरकारी इस्पितळाच्या प्रवेशद्वारासमोर सामूहिक साखळी उपोषण सुरू करण्यात आले.

समितीचे अध्यक्ष जुझे लोबो यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पेडणे तालुक्यासह शेजारील तालुक्यांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनाचा समारोप १५ जानेवारी रोजी मशाल मिरवणुकीने करण्यात येणार असून त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.

जुझे लोबो म्हणाले की, तुये येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित इस्पितळासाठी २०१४ मध्ये निविदा काढण्यात आली होती व २०१७ मध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र आता नऊ वर्षे उलटूनही या इमारतीत इस्पितळ सुरू झालेले नाही. डिसेंबर २०२४ मध्ये इस्पितळ सुरू होईल, असे आश्वासन देण्यात आले; मात्र तेही पाळले गेले नाही.

ऑक्सिजन व इतर वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी २०२१ मध्ये आर्थिक मान्यता देण्यात आली होती; मात्र प्रत्यक्ष निविदा काढण्यात आलेल्या नव्हत्या. समितीच्या पाठपुराव्यानंतर १३ कोटी ४९ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे; मात्र आवश्यक डॉक्टर, नर्सेस व सुविधा उपलब्ध होण्यासाठी आणखी काही महिने लागणार आहेत, असे लोबो यांनी सांगितले.

१ जानेवारीला सध्याच्या सामूहिक इस्पितळातील औषधालय, प्रयोगशाळा, एक ओपीडी नव्या इमारतीत हलवली जाणार असल्याची माहिती मिळाली. मात्र केवळ या तीन सुविधा हलवण्यासाठीच इमारत वापरणार असतील, तर कोट्यवधी रुपये खर्चून ती का उभारली?

- जुझे लोबो, अध्‍यक्ष, तुये इस्‍पितळ कृती समिती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Session: हिवाळी अधिवेशनाचे बिगुल वाजले! पाच दिवस, धडाकेबाज चर्चा

Goa Assembly Session: गोवा विधानसभा हिवाळी अधिवेशन 2026; पहिल्या दिवसाचे ठळक मुद्दे

Ponda By Election: रितेश, भाटीकर की आणखी कोण? फोंडा पोटनिवडणूक ठरणार विधानसभेची प्रिलीम

अग्रलेख: सरकारला दात आणि नखे असलेला 'लोकायुक्तरूपी वाघ' तरी कसा परवडला असता?

Chimbel: 'तोयार तलाव' नष्ट करणार का? चिंबल युनिटी मॉलविरुद्ध वाल्मिकी नाईकांचा एल्गार; प्रकल्प अन्यत्र हलवण्याचा दिला सल्ला

SCROLL FOR NEXT