Tukaram Shet Dainik Gomantak
गोवा

Sahitya Akademi Award: निसर्ग जाणिवेला नेणिवेत नेण्याची गरज : तुकाराम शेट

कोकणी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार तुकाराम रामा शेट यांच्या ‘जाण’ या कादंबरीला मिळाला

दैनिक गोमन्तक

किशोर अर्जुन

Tukaram Shet : ‘जाण’ ही बालकादंबरी मी सहज लिहिली होती. बालपणातील माझे काही अनुभव आणि त्याला कल्पनेची जोड देतानाच गोव्याच्या निसर्गसमृद्ध जगण्याची किनार या कादंबरीला लाभली आहे.

आपण निसर्गापासून वेगळे नाहीत, ही भावना माझ्या मनात सदैव असते आणि तोच विचार विविध स्वानुभवांचे कोंदण देत ‘जाण’च्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपल्या निसर्ग जाणिवेला व्यक्तीच्या नेणिवेत नेण्याची नितांत गरज आहे.

माझ्या याच प्रयत्नांची नोंद राष्ट्रीय स्तरावर घेत साहित्य अकादमीचा पुरस्कार या कादंबरीला जाहीर झाला, ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि ऊर्जा देणारी बाब आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम शेट यांनी साहित्य अकादमीच्या ‘बालसाहित्य पुरस्कारा’वर आपली प्रतिक्रिया ‘गोमंतक’कडे नोंदवली.

२०१३ साली साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर १० वर्षांनी साहित्य अकादमीचा बाल साहित्यासाठीचा पुरस्कार तुकाराम शेट यांना जाहीर झाला. ते म्हणतात, बालकांसाठी लिहिताना खूप काळजी घ्यावी लागते.

कारण त्याच्या जगण्याचा, विचार करण्याचा, कल्पनाशक्तीचा आवाका खूप वेगळा असतो. त्यामुळे मोठ्यांसाठी लिहिणे कधीकधी सोपे वाटत राहते. पण बालकांसाठीच्या लिखाणात लेखकाचा सर्वांगीण कस लागतो.

कोकणी साहित्यातील निसर्ग आणि लोकवेदाबद्दल याबद्दल आपले मत मांडताना तुकाराम शेट म्हणाले की, कोकणीच्या समृद्ध साहित्य विधामध्ये लोकवेदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोकवेद हे आपल्या संपन्न परंपरेचे प्रतीक आहे.

कर्नाटक, केरळमध्ये लोकवेद हा जगण्याचा केंद्रबिंदू आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या कोकणीतील लोकवेद विविध माध्यमांतून आजच्या आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी नव्या लेखकांनी आपल्यापरिने नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत. कारण यातूनच आपल्या भाषा आणि संस्कृतीची महत्तेची रुजुवात होण्यासाठी मदत होईल.

‘नवतंत्रज्ञ : व्हावा कोकणीच्या प्रसारासाठी उपयोग’

सध्याच्या पिढीच्या हातामध्ये नेहमीच स्मार्टफोन दिसतो. त्यामध्ये नवनवे तंत्रज्ञानदेखील आता विकसित होत आहे. तंत्रज्ञानामुळेच आता आपण नव्या पिढीपर्यंत सहज पोहोचू शकणार आहोत.

त्यामुळे या तंत्रज्ञानाची कास आमच्या साहित्यिकांनी धरत, या माध्यमांतून कोकणी भाषा, साहित्य, संस्कृती, कलेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असेही यावेळी तुकाराम शेट यांनी आवर्जून नमूद केले.

"पूर्वी कोकणीमध्ये बालसाहित्याला वाहिलेली मासिके प्रकाशित होत होती. आता मात्र याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. बालकांसाठी वाहिलेले दर्जेदार कोकणी साहित्यिक मासिक तर आता जवळपास प्रकाशितच होत नाही. हे चित्र बदलण्यासाठी आपण पुढे आलो पाहिजे. मुलांमध्ये साहित्याची गोडी लावण्यासाठी उत्तम साहित्यिक मासिक कोकणीमध्ये प्रकाशित होण्याची गरज आहे."

तुकाराम शेट, साहित्य अकादमीप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT