Power Cut Issue in Palolem: सततच्या विजेच्या लपंडावामुळे पाळोळेतील रहिवाशी संतप्त; वीज विभागात नागरिकांची धाव

पाळोळेमध्ये सतत वीज जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
Power Cut Issue in Palolem
Power Cut Issue in PalolemDainik Gomantak
Published on
Updated on

Power Cut Issue in Palolem: गोव्यात पावसाळा सुरू होताच विजेचा लपंडाव सुरू होतो. मात्र यामुळे लोकांना दैनंदिन आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पाळोळेमध्ये सतत वीज जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Power Cut Issue in Palolem
Panaji police station attack : बाबूश, जेनिफर यांचे पाय आणखी खोलात

गावात वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे मत रहिवाशांंनी व्यक्त केले आहे. सततच्या विजेच्या लपंडावामुळे वैतागलेल्या रहिवाशांनी अखेर काणकोण वीज विभागाचे सहाय्यक अभियंता गोविंद भट यांची भेट घेतली आणि त्यांनी गेल्या आठवड्यात दिलेल्या निवेदनावर कारवाई करण्याची मागणी केली.

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे याचा केवळ विद्युत उपकरणांवरच परिणाम होत नाही, तर आपले आर्थिक नुकसानही होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, सासष्टी तालुक्यातील ग्रामीण तसेच किनारी भागातील रहिवासी विजेच्या लपंडावाने त्रस्त झाले आहेत. येथील परिसरातील वीजपुरवठा अनेकवेळा गुल्ल होण्याचा प्रकार घडत आहे. अशाने येथील रहिवाशांना उष्णतेचे चटके सहन करावे लागत आहेत. याबरोबरच येथील व्यवसायावरही विपरित परिणाम होत असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Anaya Bangar Cricket Australia Marizanne Kapp Reaction
14 Electricity Employees Suspension Goa
Mopa Formula Racing Event
 Tata Power Goa Distribution Licence
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com