Mopa Airport: आंतरराष्ट्रीय टूर ऑपरेटर TUI Airlines UK 2 नोव्हेंबरपासून मोपा (GOX) साठी चार्टर उड्डाणे चालवणार आहे, नवीन विमानतळावर उड्डाणे जाहीर करणारा पहिला आंतरराष्ट्रीय चार्टर ऑपरेटर बनला आहे.
TUI लंडनच्या गॅटविक आणि मँचेस्टरपासून मोपामध्ये आठवड्यातून दोनवेळी ही चार्टर उड्डाणे मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतील. सध्या, एअर इंडिया ही एकमेव विमान कंपनी आहे जिने मोपा आणि यूके दरम्यान उड्डाणे निर्धारित केली आहेत.
(Charter flight from UK to Mopa twice in week)
दरम्यान, दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी (GOI) मात्र कोणत्याही चार्टर फ्लाइटची घोषणा अद्याप केली गेलेली नाही. दाबोळी विमानतळाला त्यांचे पहिले चार्टर उड्डाण 1 ऑक्टोबर रोजी मिळण्याची अपेक्षा आहे.
GMR गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (GGIAL) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. व्ही. शेषन म्हणाले की, “मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला TUI सोबत आपली नवीन भागीदारी जाहीर करताना आनंद वाटत आहे.
औपचारिकरित्या अजूनही त्यावर काम सुरू आहे. विमानतळ आणि या प्रदेशाला लाभ देण्यासाठी गोव्यात अतिरिक्त फ्लाईट आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
TUI ने यूकेमधील आपल्या ग्राहकांना ईमेल देखील पाठवले आहेत. त्यांच्या ज्या ग्राहकांनी सुट्टीचे पॅकेज बुक केले आहे त्यांना मोपा विमानतळावर आता फ्लाईट उतरतील अशी माहिती दिली जात आहे.
गत पर्यटन हंगामात आठवड्यातून फक्त दोन चार्टर मिळाले होते. कारण ई-व्हिसाबाबत समस्या असल्यामुळे TUI ला राज्यासाठी चालवल्या जाणाऱ्या चार्टर्सची संख्या कमी करावी लागली होती. तथापि, मोपा विमानतळावर आता ई-व्हिसा स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.