Goa Hospitality Institute: गोव्यात होणार हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण संस्था; पदवी, पदविका, व्यावसायिक अभ्यासक्रम...

दोन टप्प्यात बांधकाम, स्थानिक तरूणांना कौशल्य विकासातून देणार रोजगार
Goa Hospitality Trainin Institute
Goa Hospitality Trainin Institute Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Govt to Start Hospitality Training Institute: गोवा हे पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाचे राज्य आहे. राज्याच्या एकूण महसुलातील मोठा वाटा पर्यटन क्षेत्रातून येत असतो. दरम्यान, राज्यातील युवकांना रोजगार मिळावा आणि पर्यटन क्षेत्रातील कौशल्यातून हा रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकार आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यासाठी संस्था उभारणार असल्याचे समजते.

Goa Hospitality Trainin Institute
Goa Accident: बांदोडा-फोंडा उड्डाण पुलावर क्रेन-ट्रकचा अपघात; केबिनमध्येच चालक अडकला...

हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रातील कौशल्य विकास उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी तसेच उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने हे काम हाती घेतल्याचे समजते.

या प्रशिक्षण संस्थेचे बांधकाम दोन टप्प्यात केले जात आहे. पहिल्या टप्प्यात संस्थेची मुख्य रचना आणि मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह यांचा समावेश होतो; तर दुसऱ्या टप्प्यात इनडोअर स्पोर्ट्स सुविधा, मैदानी क्रीडा सुविधा, स्टाफ क्वार्टर, प्राचार्यांसाठी घर, कॅफेटेरिया, ओपन एअर थिएटर, गॅस बँक, पार्किंग, ट्रान्सफॉर्मर आणि एसटीपी यांचा समावेश आहे.

पर्यटन विभागाने म्हटले आहे की, "गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्रोजेक्ट सेल (SPV) द्वारे पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.

Goa Hospitality Trainin Institute
Goa Monsoon 2023: दिवसभरात जोरदार पावसाची शक्यता; गोवा वेधशाळेने दिला यलो अलर्ट

संस्थेमध्ये आदरातिथ्य, पर्यटन आणि संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक अभ्यासक्रम, पदविका आणि पदवी अभ्यासक्रमासाठी परवानाधारक नियुक्त करण्याची प्रक्रिया विभागाने सुरू केली आहे."

परवानाधारक स्वतः किंवा जागतिक दर्जाचे आदरातिथ्य आणि कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था किंवा ब्रँडसह भागीदारी करून संस्थेचे संचालन आणि देखभाल करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com