ख्रिश्चनधर्मीय ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत 'गोवा टुर'; 'या' राज्य सरकारने घेतला निर्णय

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
Jharkhand Govt Decision Cristian sinior citizen goa tour
Jharkhand Govt Decision Cristian sinior citizen goa tourDainik Gomantak
Published on
Updated on

Jharkhand Govt Decision: झारखंड पर्यटन विकास महामंडळ लिमिटेडच्या वतीने राज्यातील ख्रिश्चन धर्मियांसाठी बीपीएल श्रेणीतील लाभार्थी यात्रेकरूंना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात गोव्यात सहलीसाठी पाठवले जाणार आहे. या प्रवासासाठी विशेष ट्रेन करण्यात आली आहे. धनबाद जिल्ह्यातून 81 ख्रिस्ती धर्मीय यात सहभागी होणार आहेत.

अनेक राज्यांमध्ये राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थक्षेत्र यात्रांचे आयोजन करण्यात येते. तथापि, झारखंड राज्य सरकारने मात्र इतर धर्मिय नागरिकांसाठी तीर्थक्षेत्र यात्रांचेय आयोजन करतानाच ख्रिश्चन धर्मियांसाठी गोवा टुरचे आयोजन केले आहे.

गोव्यात एक ख्रिश्चन परंपरा लाभली आहे. येथे साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांची सत्ता होती. येथे अनेक जुनी, ऐतिहासिक चर्चेस आहेत. ते पाहण्यासाठी देशभरातील ख्रिश्चनधर्मीय गोव्याकडे येत असतात.

आपल्या धर्माची तीर्थस्थळे पाहण्यासाठी लोक विविध ठिकाणी प्रवास करत असतात, त्याचप्रमाणे झारखंड राज्य सरकारने त्यांच्या राज्यात अल्पसंख्य असलेल्या ख्रिश्चन धर्मियांसाठी या योजनेतून गोवा दाखवण्याचे ठरवले आहे. तथापि, योजनेतील निकषामध्ये बसणाऱ्या ख्रिश्चन धर्मियांनाच याचा लाभ घेता येणार आहे.

Jharkhand Govt Decision Cristian sinior citizen goa tour
Goa Hospitality Institute: गोव्यात होणार हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण संस्था; पदवी, पदविका, व्यावसायिक अभ्यासक्रम...

या योजनेतून अर्ज करण्यासाठी, गरीब ज्येष्ठ नागरिक तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी, विहित नमुन्यातील अर्ज भरावा लागेल आणि मूळ वैद्यकीय प्रमाणपत्र, प्रवास प्रमाणपत्रासाठी तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र, 2 छायाचित्रांसह अर्जासोबत द्यावे लागतील.

जवळच्या गट/उपविभाग/जिल्हा क्रीडा कार्यालयात किंवा उपायुक्त कार्यालयात हा अर्ज द्यावा लागेल. यासाठी 25 सप्टेंबर 2023 ही अखेरची मुदत आहे.

यात्रेकरूंची निवड जिल्हास्तरीय व्यवस्थापन समितीद्वारे केली जाईल. 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर ही निवड केली जाईल. यात्रेकरूंची संख्या निर्धारित संख्येपेक्षा जास्त वाढल्यास एक प्रतीक्षा यादी तयार केली जाईल.

Jharkhand Govt Decision Cristian sinior citizen goa tour
गोव्यातून दुसऱ्याच्याच नावाने घेतली पदवी; आसाममधून पॅनकार्ड, उत्तराखंडातून पासपोर्ट, 'मि. नटरवलाल'कडे 10 बनावट ओळखपत्रे

या तीर्थ यात्रेसाठी पात्रता

  • यात्रेकरूचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असावे

  • झारखंड राज्याचा कायमचा रहिवासी असावा

  • यात्रेकरू बीपीएल श्रेणी अंतर्गत असाा (करदाता नसावा)

  • यात्रेकरूने यापूर्वी या प्रकारच्या तीर्थक्षेत्र योजनेचा लाभ घेतलेला नसावा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com