Goa Zilla Panchayat: Dainik Gomantak
गोवा

Goa Zilla Panchayat: जि. पं. अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

Goa News: अविश्‍वासासाठी हालचाल: बैठकीसाठी अध्यक्षांना पत्र

दैनिक गोमन्तक

Goa News: दोन महिने उलटून गेले, तरी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची बैठक घेण्यात आली नसल्याने कार्तिक कुडणेकर यांच्यासह 16 जिल्हा पंचायत सदस्यांनी पत्र पाठवून बैठक घेण्याची मागणी केली आहे. हे पत्र बैठक बोलवण्यासाठी असली तरी अध्यक्ष सिद्धेश नाईक यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

एक वर्ष उलटून गेले तर ते पद सोडण्यास तयार नसल्याने हे डावपेच सुरू झाले आहेत. बैठकीच्या निमित्ताने अध्यक्षपदासाठीची रस्सीखेच सुरू झाली आहे. या जिल्हा पंचायत सदस्यांनी अध्यक्षांना पत्र पाठवले आहे, त्यामध्ये पंचायत राज कायद्याच्या कलम 136(1) नुसार दोन महिन्यातून किमान एक बैठक घेण्याची तरतूद आहे.

दोन महिने उलटून गेले, तरी बैठक बोलावण्यात आलेली नाही, त्यामुळे या जिल्हा पंचायतीच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्यासाठी ही बैठक तातडीने बोलावण्यात यावी. शेवटची बैठक 13 सप्टेंबर 2013 रोजी झाली होती. त्यामुळे अध्यक्षांनी बैठक बोलावली अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

यासंदर्भात उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दोन महिन्यात किमान एक बैठक घेण्याची कायद्यात तरतूद आहे, अध्यक्षांना ती केव्हा घ्यावी, याबाबतही त्यात अधिकार आहेत. ही बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येईल. हल्लीच राष्ट्रीय स्पर्धा व त्यानंतर दिवाळीमध्ये काही जिल्हा पंचायत सदस्य गोव्याबाहेर गेले असल्याने ही बैठक घेण्यास उशीर झाला. 25 जिल्हा पंचायत सदस्यांपैकी अर्ध्याहून अधिक हे आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे जो संशय व्यक्त केला जात आहे, त्याच्याशी काहीच संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

...म्हणून सदस्यांमध्ये खदखद

बैठक घेण्यासाठी केलेल्या पत्रात सह्या असलेल्या जिल्हा पंचायत सदस्यांपैकी भाजप समर्थक असलेले काहीजण हे अध्यक्षपदासाठी उत्सुक आहेत. या पंचायतीच्या कार्यकाळाला येत्या जानेवारीत तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. हे अध्यक्षपद एका वर्षासाठी भूषवण्याचे यापूर्वी ठरले होते, मात्र वर्ष उलटून गेले, तरी विद्यमान अध्यक्ष पायउतार होण्यास तयार नसल्याने उत्सुक असलेल्या सदस्यांमध्ये खदखद सुरू झाली आहे. त्यांनी बहुमत मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT