Tuem Electronic City Dainik Gomantak
गोवा

सहा वर्षात फक्त रस्ते & खांब, एकही कंपनी नाही; मोदींनी भूमिपूजन केलेली तुये इलेक्ट्रॉनिक सिटी ओसाड

बहुउद्देशीय तुये इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्पात गेल्या सहा वर्षांत एकही कंपनी उभी राहू शकलेली नाही.

Pramod Yadav

पेडणे तालुक्यात तीन महत्वाच्या आणि मोठ्या प्रकल्पांचे उद्धाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यात मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ, तुये हॉस्पिटल आणि तुये इलेक्ट्रॉनिक सिटी असे हे तीन प्रकल्प होते. दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मोदींच्या हस्ते मोपा विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले.

पण, या तालुक्यात असलेला महत्वाचा तुये इलेक्ट्रॉनिक सिटी हा प्रकल्प मागील सहा वर्षांपासून ओसाड पडला आहे.

बहुउद्देशीय तुये इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्पात गेल्या सहा वर्षांत एकही कंपनी उभी राहू शकलेली नाही. तसेच, सिटीत केवळ रस्ते आणि विद्युत खांब उभारण्यात आले आहेत. याशिवाय याठिकाणी आलेले दुकानदार देखील गायब झाले आहेत.

राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे. सध्याचे मुख्यमंत्री या प्रश्नाबाबत वेळ देत नसून, काम केव्हा सुरू होणार याबाबत देखील माहिती देत नसल्याचे पार्सेकर म्हणाले. मागील सहा वर्षांपासून प्रकल्पात प्रगती होत नसल्याने अतिव दु:ख होत असल्याचे ते म्हणाले.

'इलेक्‍ट्रॉनिक सिटीला जाणाऱ्या लिंक रोडचे काम अद्याप झालेले नाही. तसेच 10 एमएलडी पाणी प्रकल्प आणि 220 केव्हीए वीज उपकेंद्रही अजून उभारण्यात आलेले नाही. ज्या कंपन्या, दुकाने येथे उभारले जाणार होते, ते सर्व निघून गेले आहेत. आता येथे गुंठा मंत्री येतील.' असे पार्सेकर म्हणाले.

सहा वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पणजी येथून व्हर्च्युअल पद्धतीने या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. तरीही गेल्या सहा वर्षांत या प्रकल्पात एकही कंपनी उभी राहू शकली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT