CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांचा साधेपणा, केला ट्रेनने प्रवास... रेल्वेत 'या' सुविधेसाठी केंद्राकडे करणार मागणी

नेत्रावली एक्सप्रेसमधून मुख्यमंत्री सावंत यांनी प्रवास केला.
Published on

सतत सुरक्षा आणि व्हिआयपी माहौलमध्ये राहणारे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहेत. सावंत यांनी मंगळूरू (Mangaluru) येथील विश्व कोंकणी समारंभाला उपस्थिती लावल्यानंतर ते गोव्यात परत येत होते. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चक्क ट्रेनमधून प्रवास करणे पसंद केले. नेत्रावली एक्सप्रेसमधून मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्यापर्यंत प्रवास केला.

CM Pramod Sawant
Pramod Sawant: पक्षनिष्ठा! कर्नाटकसाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची बॅटिंग... म्हणाले तिथेही पुन्हा भाजपच

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या या ट्रेन प्रवासाचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. ट्रेन प्रवासात देखील मुख्यमंत्री काम करताना दिसत आहेत. अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.

गोवा-मंगळूरू वंदे भारत ट्रेनसह विमान सेवेने जोडणार

गोवा-मंगळूरू, गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेनची गरज आहे. याबाबत रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करणार आहे. तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवला जाणार आहे. तसेच, गोवा-मंगळूरू ही ठिकाणे रेल्वे आणि विमान सेवेने जोडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

CM Pramod Sawant
CM Pramod Sawant: गोवा-मंगळूरू वंदे भारत ट्रेनसह विमान सेवेने जोडणार...

रेल्वेत वायफाय कनेक्टिव्हिटीचीही मागणी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रेल्वेत वायफाय कनेक्टिव्हिटीची मागणी केली आहे. याबाबत देखील रेल्वे मंत्र्यांकडे लेखी मागणी करणार असल्याचे सावंत म्हणाले. मुंबईमधून मंगळूरूला येणारी ट्रेन पुढे गोव्यापर्यंत यावी असे देखील त्यांनी यावेळी म्हटले. याचा दोन्ही राज्याच्या पर्यटनाला फायदा होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकात पुन्हा भाजपच विजयी होईल

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्नाटकमध्ये पुन्हा भाजप सरकारच विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. फक्त भाजप सरकारच 'न्यू कर्नाटक'चे स्वप्न पूर्ण करू शकते असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com