Truck Accident at Bambolim Dainik Gomantak
गोवा

Accident at Bambolim: बॅरीकेड तोडून ट्रक झाला पलटी; बांबोळी महामार्गावरील घटना

सुदैवाने या अपघातात ड्रायव्हर सुखरूप बचवला आहे.

दैनिक गोमन्तक

Truck Accident at Bambolim: आज पहाटे बांबोळी येथे राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकचा अपघात झाला आहे. महामार्गाच्या बाजूला असलेल्या बॅरीकेडला धडक बसल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रक बॅरीकेडला धडकून पलटी झाला आहे.

सुदैवाने या अपघातात ड्रायव्हर सुखरूप बचवला आहे. ट्रक वेर्णाकडून भिवंडीला जात होता. या अपघातानंतर असे म्हटले जात आहे की, अधिकार्‍यांनी वैयक्तिक हितासाठी NH चा मूळ प्रस्तावित मार्ग वळवला असून त्याचा परिणाम म्हणजे हे असे अपघात होत आहेत.

ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच्या विरुद्ध एका मोठ्या व्यावसायिक इमारतीचे काम सुरू आहे. त्याच जागी मूळ राष्ट्रीय महामार्ग पास होणार होता. त्यामुळे या नियमित अपघातास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, परवा एक विचित्र अपघात खांडेपार येथे घडला. ओपा - खांडेपार तिठ्यावर परवा संध्याकाळी सातच्या सुमारास सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. सुदैवाने या अपघातात वाहनचालक किरकोळ जखमांवर बचावले.

मात्र, तीन दुचाक्यांचा चुराडा झाला, तर दोन्ही ट्रकांसह कारगाडीचेही मोठे नुकसान झाले. या तिठ्यावर उभे असलेल्या चौघांनी प्रसंगावधान राखून रस्त्याच्या बाजूला उडी घेतल्याने ते सुदैवाने बचावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT