Khandepar Accident : काळ आला होता, पण....खांडेपार येथे 6 वाहनांचा विचित्र अपघात; प्रत्यक्षदर्शी अचंबित

तीन दुचाकींचा चुराडा : दैव बलवत्तर म्हणून पाचजण बचावले
Khandepar Accident
Khandepar AccidentDainik Gomantak

Goa Accident News : ओपा - खांडेपार तिठ्यावर आज संध्याकाळी सातच्या सुमारास सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. सुदैवाने या अपघातात वाहनचालक किरकोळ जखमांवर बचावले. मात्र, तीन दुचाक्यांचा चुराडा झाला, तर दोन्ही ट्रकांसह कारगाडीचेही मोठे नुकसान झाले. या तिठ्यावर उभे असलेल्या चौघांनी प्रसंगावधान राखून रस्त्याच्या बाजूला उडी घेतल्याने ते सुदैवाने बचावले.

फोंड्याहून उसगावच्या दिशेने जाणारा केए ०६ एए ५१६७ क्रमांकाचा मालवाहू ट्रक ओपा - खांडेपार तिठ्यावर आल्यानंतर नवीन खांडेपार पुलावर जाण्यासाठी वळसा घेण्याच्या तयारीत असतानाच अचानक रस्त्यावरच उलटला. या कर्नाटक राज्यातील ट्रकचालकाला रस्ता बदलाची माहिती नसल्याने गोंधळून गेल्याने त्याने अचानक ब्रेक लावला.

त्यामुळे हा ट्रक उलटला आणि घसरत पुढे येऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानाजवळ स्थिरावला. मात्र, या अपघातात रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या तीन दुचाकी या ट्रकखाली आल्याने त्यांचा चुराडा झाला.

Khandepar Accident
एकाने माहिती मिळवायची, दुसऱ्याने टेहळणी करायची, तिसऱ्याने रेल्‍वेतून सोने लुटायचे; आंतरराज्‍य टोळी गजाआड

हा अपघात होत असतानाच उसगावच्या दिशेने जाणाऱ्या जीओए - ०३ - के - ८६६८ या क्रमांकाच्या ट्रकचालकाने घाबरून ब्रेक लावला असता हा ट्रक पुढे जाऊन कलंडला. नेमके त्याच वेळेला उसगावहून फोंड्याच्या दिशेने येणारी जीए - ०४ - ई - ६९६५ ही कारगाडी या ट्रकच्या बाजूला सापडली.

सुदैवाने ट्रक कारगाडीवर उलटला नाही. अन्यथा कारचालकाच्या जिवावर बेतले असते. हा ट्रक कारगाडीच्या बाजूला उलटल्याने कारचे नुकसान झाले.

अपघातापूर्वी भर बाजारातच महाराष्ट्र राज्यातील एक मालवाहू ट्रक एमएच - ०५ - ईएल - ४२०५ टायर पंक्चर झाल्याने बाजारातच उभा करून ठेवला होता. आधीच अरुंद रस्ता त्यातच अवजड ट्रक रस्त्यावर पार्क केलेला, त्यामुळे गोंधळलेल्या इतर अपघातग्रस्त चालकांनी ब्रेक लावल्याने हा विचित्र अपघात घडला, असे तेथील नागरिकांनी सांगितले.

Khandepar Accident
Gomantak Impact: एलएलबी प्रवेश घोळाची चौकशी करा; सरकारचा आदेश

अवजड ट्रक बाजारातून नकोच...

कुर्टी - उसगाव महामार्गावर नवीन खांडेपार पूल बांधण्यात आला आहे. मात्र, या पुलाच्या कुर्टी भागाकडील जोडरस्त्याचे काम अपूर्ण आहे. या जोडरस्त्याजवळ तेथील एक प्राचीन घर येत असल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर प्रकरण मिटवले गेले व घर हटवले, पण अजूनपर्यंत हा जोडरस्ता बांधलेला नाही.

त्यामुळे तिठ्यावर येऊन वाहने पुन्हा वळवून नवीन पुलावरून नेली जातात. या प्रकारामुळे परराज्यातील वाहनचालकांचा गोंधळ होतो आणि अपघात होतात. त्यामुळे अवजड वाहने तिठ्यावर न आणता परस्पर जोडरस्त्याच्या बगल मार्गावरून नेली जावीत, अशी मागणी स्थानिक करीत आहेत. आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

काळ आला होता; पण....

अपघात होत असतानाच या तिठ्यावर चौघेजण उभे होते. ट्रक उलटून घसरत पुढे येत असल्याचे पाहून या चौघांनी रस्त्याच्या बाजूला उडी घेऊन पळ काढला. अन्यथा हे चौघेजण ट्रकखाली आले असते. तसेच एका ट्रकने जोरात ब्रेक लावल्याने तो कलंडला. सुदैवाने तो त्याचवेळेला तेथून जाणाऱ्या कारवर उलटला नाही. त्यामुळे कारचालक बचावला, असे एक दुकानदार संदीप पारकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com